Raigad Crime : दादांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष शिकारी? घरात सापडले संरक्षित वन्य प्राण्याचे मांस, वनविभागाची झाडाझडती अन् पोलिसांची कारवाई

Action by Forest Department and Police : वन विभाग आणि अलिबाग पोलिसांनी संरक्षित वन्य जीव प्राण्यांच्या शिकारीवरून कारवाई केली आहे. ही कारवाई अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Raigad Crime
Raigad Crimesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या घरातून मांस आढळल्याने कारवाई करण्यात आली.

  2. हा वन्य प्राणी संरक्षित असल्याने वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

  3. पोलिसांनी मुद्देमाल वन विभागाकडे सुपूर्द केला असून चौकशीसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Alibag News : वन विभाग आणि अलिबाग पोलिसांनी वाडगाव येथे संरक्षित वन्य प्राणी असलेल्या भेकराच्या शिकारीच्या संशयावरून कारवाई केली आहे. या कारवाईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष आणि वाडगावचे उपसरपंच जयेंद्र भगत अडचणी आले आहेत. त्यांच्या घरात भेकराचे मांस सापडल्याने चौकशी करून गुन्हा दाखल केला जात आहे. तर आगामी स्थानिकच्या तोंडावर अशी कारवाई राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यावर झाल्याने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संरक्षित वन्य प्राणी असलेल्या भेकराचे मांस घरात ठेवल्याबद्दल अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि वाडगावचे उपसरपंच जयेंद्र भगत यांच्यावर अलिबाग पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी मुद्देमाल वन विभागाकडे देण्यात आलेला आहे. वन विभागातर्फे जयेंद्र भगत यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाडगाव येथील उपसरपंच जयेंद्र भगत यांनी फणसाड अभयारण्यात शिकार केली होती. त्यानंतर संरक्षित वन्य जीव प्राण्याचे मांस घरात ठेवल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथकासह भगत यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी फ्रिजमध्ये भेकराचे मांस सापडून आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. मुसळे यांनी दोन पंचासमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला आणि पुढील कारवाईसाठी वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांच्या ताब्यात दिला.

Raigad Crime
Raigad Crime : जिल्हा परिषदेत आर्थिक अपहार प्रकरणाला धक्कादायक वळण, आरोपी कर्मचाऱ्याची आत्महत्या, सहआरोपींचे पाय आणखी खोलात

शिकार कोणी केली याचा तपास करणार

दरम्यान अलिबाग वनविभागाचे नरेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जयेंद्र भगत याना ताब्यात घेतले असून ही शिकार कोणी केली? त्यांच्यासोबत कोण होते? हत्यारं कोणती होती? शिकार केलेल्या भेकराच्या मांसाचं काय केलं याचा आता तपास केला जात आहे.

दरम्यान आता या प्रकरणी वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुढील तपास काय समोर येत याकडे जिल्ह्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे. तर स्थानिकच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर अशी कारवाई झाल्याने आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

FAQs :

1️. जयेंद्र भगत यांच्यावर कोणत्या कारणामुळे कारवाई झाली?
त्यांच्या घरात संरक्षित वन्य प्राणी भेकराचे मांस आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली.

2️. भेकर हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
भेकर (Indian Wolf) हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे.

3️. पुढील तपास कोण करत आहे?
पुढील तपास अलिबाग वन विभागाकडून करण्यात येत आहे.

4️. जयेंद्र भगत कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि वाडगावचे उपसरपंच आहेत.

5️. गुन्हा कोणत्या कायद्यानुसार दाखल होणार आहे?
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com