Nilesh Rane On Narayan Rane Oath : तुमच्यातला खरा माणूस अजून...; निलेश राणेंनी सांगितली 'बापा'ची संघर्षमय कहाणी

Maharashtra Political News : निलेश राणेंनी उलगडला नारायण राणेंचा नगरसेवक ते खासदार प्रवास
Nilesh Rane
Nilesh RaneSarkarnama

Konkan Political News : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते, माजी मंत्री नारायण राणे खासदार झाले आहेत. त्यांनी आज संसदेत हिंदी भाषेतून शपथ घेतली.

राणेंनी Narayan Rane शपथ घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी तुमच्यातला खरा माणूस अद्यापही अनेकांना कळलाच नाही, असा भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत निलेश राणेंनी सोशल मीडियावर शपथविधीच्या व्हिडिओही पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये निलेश राणेंनी Nilesh Rane वडिलांचा संघर्षमय राजकीय प्रवास थोडक्यात उलगडला आहे. ते म्हणाले, 1985 नगरसेवक, 1990 ते 2014 सलग सहा वेळा आमदार (1 पोटनिवडणूक), 2014 ते 2024 विधानपरिषद 1 वेळा राज्यसभा 1 वेळा आणि 2024 आज लोकसभा खासदार, या पदांचा निलेश यांनी सुरुवातीस उल्लेख केला आहे.

ही सगळी पदे सहज आली नाही. त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो, मलाच कळले नाही, पण तुम्हाला जरी नाही कळले तरी ते आम्हाला दिसले. इतकी लोक इतके वर्षे जोडून ठेवणे सोप्प नाही, याकडेही निलेश राणेंनी लक्ष वेधले.

Nilesh Rane
Balwant Wankhede Oath : अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंची मराठीत शपथ अन् 'जय भीम-जय शिवराय'ने शेवट...

जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजले. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही, निलेश नितेशला सांभाळा, कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार, असा विश्वासही निलेश राणेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Nilesh Rane
Video Porsche Accident Case Update : मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दणका; अल्पवयीन आरोपीचा जामीन मंजूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com