Balwant Wankhede Oath : अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंची मराठीत शपथ अन् 'जय भीम-जय शिवराय'ने शेवट...

Sansad Oath Ceremony : सध्या मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Balwant Wankhede Oath
Balwant Wankhede OathSarkarnama

Vidarbh Political News : देशातील 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सध्या सर्व खासदारांची शपथविधी सुरू आहे. यात अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी संसदेत मराठीत शपथ घेतली.

शपथ घेताना त्यांनी आपल्या आईचेही नाव घेतले. तसेच शपथ घेतल्यानंतर त्यांनी 'जय भीम, जय शिवराय' जयघोषाने समारोप केला. यातून त्यांनी सामाजिक समरसतेचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

अमरावतीच्या राखीव मतदारसंघातून बळवंत वानखेडे निवडून आले आहेत. नवनीत राणा Navneet Rana यांच्यामुळे अमरावतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. राणा यांची लोकप्रियता आणि उद्धव ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेतल्याने त्या सहज निवडून येईल असेच सर्वांना वाटत होते.

भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी निवडणुकीत त्यांच्यासाठी सभा घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. असे असताना महाविकास आघाडीने बळंवत वानखेडे यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला होता.

आमदार असतानाही जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी लोकसभेच्या उमेदवारीने वानखेडे यांना मिळवून दिली. काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांची अमरावतीमध्ये विक्रमी सभा झाली आणि संपूर्ण वातवरणच बदलले.

आज वानखेडे अमरातीमधून दिल्लीच्या संसदेत जाऊन बसले आहेत. वानखेडे यांचा विजय काँग्रेससाठी जेवढा महत्त्वाचा ठरला, त्यापेक्षा मोठा धक्का राणा दाम्पत्य आणि भाजपला बसला. तसेच उमेदवार लादणे यापुढे चालणार नाही असा इशारा येथील मतदारांनी भाजपला दिला.

Balwant Wankhede Oath
Video Nagesh Patil : शपथविधीवेळी वडील अन् बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण; अध्यक्षांनी नागेश पाटील-आष्टीकरांची शपथ थांबवली अन्...

बच्चू कडू Bacchu Kadu यांचीही भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरली. त्यांनी प्रहार संघटनेच्यावतीने दिनेश बुब यांना उभे केले होते. प्रचारादरम्यान राणा आणि कडू यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले होते.

खासदारांच्या संपर्क कार्यालयावर राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनी दावा केला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच संपर्क कार्यालयाचे कुलूप तोडल्याने मोठा वाद उफाळून आला आहे. पोलिसांनी खासादारांवर गुन्हे दाखल करून पुन्हा कार्यालय सील केले आहे. वानखेडे यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

सध्या मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण निवडणुकीत संविधानाला भाजपकडून धोका असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वानखेडे Balwant Wankhede यांनी जय भीम, जय शिवारायांचा जयघोष करून राज्यात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Balwant Wankhede Oath
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं; 'या' घटकांना शपथ केली अर्पण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com