Bhaskar Jadhav News : "उद्धव ठाकरे वापरून घेणार, याची कल्पना भास्कर जाधवांना आली असेल"

Bhaskar Jadhav Latest News : "चिपळूण-रत्नागिरीतील लोकांसमोर खोटं बोलणं, या वयात तरी जाधवांनी बंद करावं."
bhaskar jadhav uddhav thackeray
bhaskar jadhav uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी चिपळून येथे रविवारी ( 10 मार्च ) कार्यकर्ता मेळावा घेतला. या वेळी भास्कर जाधवांनी मनातील सल बोलून दाखवत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावरून भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांना डिवचलं आहे. "उद्धव ठाकरे वापरून घेणार, याची कल्पना तुम्हाला आली असेल. तुम्हाला बाहेर कोणी किंमत देत नाही. आता तुमचे डोळे उघडतील. यापुढे रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा," असा टोला नीलेश राणेंनी लगावला आहे.

bhaskar jadhav uddhav thackeray
Vishal Patil News : "विश्वजित आमच्या विमानचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण...", भाजप प्रवेशावर विशाल पाटील स्पष्टच बोलले

नीलेश राणे ( Nilesh Rane ) म्हणाले, "चिपळूण येथील सभेत भास्कर जाधवांनी जपून शब्द वापरले, याचा मला आनंद आहे. आमची हीच अपेक्षा आहे. आम्हाला वाईट शब्द वापरायला आवडत नाही. पण, ज्यांची संस्कृती जशी, त्याला त्याच भाषेत उत्तर देतो."

"भास्कर जाधवांना ( Bhaskar Jadhav ) सहकाऱ्यांवर टीका करावी लागली. हे तुमच्याच बाबतीत का घडतं? याचा विचार करा. मी चिपळूणमध्ये राहत नाही. तरी चिपळूणमधील अनेक सहकारी सावलीसारखं माझ्याबरोबर राहतात. तुम्ही चिपळूणमध्ये असताना तुमचे सहकारी तुम्हाला सोडून जातात. त्यामुळे दुसऱ्यांवर टीका करून काही होत नाही. तुम्ही लोकांना कसं वेठीस धरलं, कोणते शब्द वापरले, याचा विचार करा," असा सल्ला राणेंनी जाधवांना दिला.

bhaskar jadhav uddhav thackeray
Tanaji Sawant Vs Uddhav Thackeray : 'मी अयोग्य मंत्री असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही...' ; तानाजी सावंतांनी केला पलटवार!

"चिपळूण-रत्नागिरीतील लोकांसमोर खोटं बोलणं, या वयात तरी जाधवांनी बंद करावं. लोकांना खरं खोटं सर्व समजतं. यानिमित्तानं एवढंच सांगतो, उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार, याची कल्पना आली असेल. तुम्हाला बाहेर कोणी किंमत देत नाही. आता तुमचे डोळे उघडतील. यापुढे हा रडगाणे कार्यक्रम बंद करा. आमच्यासारखी अनेक लोकं तुमच्याकडे पूर्वी आदरानं बघत होती. पण, आज अनेकजण तुम्हाला सोडून गेली आहेत," असंही नीलेश राणेंनी म्हटलं.

R

bhaskar jadhav uddhav thackeray
Parbhani Loksabha Constituency : निष्ठावान बंडू जाधवांसाठी उद्धव ठाकरे परभणीला कधी येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com