Parbhani Loksabha Constituency : निष्ठावान बंडू जाधवांसाठी उद्धव ठाकरे परभणीला कधी येणार?

Parbhani Loksabha Constituency : मराठवाड्यामध्ये शिवसेनेतील नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत.
Parbhani Loksabha Constituency
Parbhani Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : राजकीय स्वार्थासाठी नेते पक्ष बदल करताना आपण नेहमीच बघतो. यासाठी नैतिक मूल्यांचा जराही विचार न करता पक्षांतर करणे नित्याचेच झाले आहे. पक्षांतरावर अंकुश आणण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आणावा लागला. काँग्रेस भाजप व इतर प्रमुख पक्षासाठी नेत्यांचे पक्षांतर ही नवीन बाब नसली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र याला अपवाद होती. (Latest Marathi News)

Parbhani Loksabha Constituency
' तरीही आम्ही हिम्मत हरणार नाही ' सरोज पाटलांनी कोल्हापुरात बोलून दाखवलं | Saroj Patil On NCP |

शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांवर गद्दारीचा शिक्का बसत असे. आणि अशा गद्दारीच्या शिक्का पडलेल्या नेत्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागे. शिवसेना सोडलेल्या राज्यातील अनेक नेत्यांना अशा प्रकारचा फटका बसलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही राज्यातील ग्रामीण भागात व विशेषतः मराठवाड्यामध्ये शिवसेनेतील नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव हे निष्ठावंत नेत्यांमधील प्रमुख नाव आहे.

निष्ठावंत लोकप्रतिनिधी असलेल्या मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. धाराशिव मधील ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी ठाकरे यांनी नुकताच धाराशिवचा दौरा केला. त्यामुळे परभणीतील संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासाठी ठाकरे परभणीत कधी येणार याची प्रतिक्षा शिवसैनिकांना लागली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी म्हणजे खासदार की पक्की हे समीकरण पक्के असल्यामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकजण देव पाण्यात घालून बसतात.

Parbhani Loksabha Constituency
Nanded BJP : अशोक चव्हाण हे चिखलीकरांचा गेम करणार...? की पाठीशी उभे राहणार...?

परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा (Shiv Sena) खासदार निवडून येण्याची जशी परंपरा आहे, तशीच निवडून आलेला लोकप्रतिनिधी शिवसेना सोडून जाण्याचीही परंपरा आहे. दिवंगत नेते अशोक देशमुख, सुरेश जाधव, गणेश दुधगावकर, तुकाराम रेंगे या शिवसेना खासदारांनी पक्ष सोडला. या नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश करून नशीब आजमावले परंतु जनतेने त्यांच्या निर्णयाला कधीच कौल दिला नाही. त्यामुळे शिवसेना आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदार यांचे नाते अधिक घट्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्यानंतरसुद्धा संजय जाधव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिवसेना खासदारांनी पक्ष सोडण्याची परंपरा संजय जाधव यांनी मोडली. तसेच परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील हे ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे निष्ठावंत नेते व शिवसैनिक असलेल्या परभणी जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केव्हा येणार याची प्रतिक्षा शिवसैनिकांना लागली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com