

जैन मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणेंची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण झाला.
याआधीही जैन मुनींच्या वक्तव्यांमुळे राज्यात वाद निर्माण झाला होता.
या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
Mumbai/Kokan Politics : महावीर जयंतीच्या दिवशी एका कार्यक्रमात जैन मुनी नयन पद्मसागर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नयपद्य सागर यांनी महाराणी ताराराणी या जैन असल्याचे म्हटलं होतं. ज्यानंतर राज्यात वाद उफाळला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील नयन पद्मसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर राष्ट्र संत मुनी निलेश चंद्र यांनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यावरून पुढे येत नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यासाठी महाराष्ट्रातील जनता आणि मराठ्यांची माफी मागितली होती.
तसेचनयन पद्मसागर यांचे ते वक्तव्य जैन समाजाचे नसून त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. या स्पष्टीकरणानंतर या वादावर पडदा पडला होता. मात्र आता याच निलेशचंद्र मुनींनी भाजप मंत्री तथा मंत्री नितेश राणे यांची उंची शिवरायांएवढी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच पाहायला मिळत आहे. यात भाजपचे काही नेतेही पुढे आहेत. तर मंत्री नितेश राणे याबाबत आघाडीवर आहेत. पण आता त्यांच्या उंचीवरून राष्ट्र संत मुनी निलेश चंद्र यांनी वक्तव्य केलं आहे. पण मुद्दा त्यांच्या उंचींचा नसून तो थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडण्याचा पराक्रम निलेशचंद्र मुनी यांनी केला आहे. यामुळेच मोठा वाद निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे या कार्यक्रमाला नितेश राणे यांची उपस्थिती होती.
करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्याबद्दल नयपद्यम सागर यांनी, त्या जैन असल्याचं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन शिवसेनेसह राज्यातील विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नयन पद्मसागर यांचा समाचार घेत होते. तर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावरून हा वाद अधिक भडका होता. तर वाद वाढत जात असतानाच निलेशचंद्र मुनी नयन पद्मसागर यांच्यावर जोरदार प्रहार करत महाराष्ट्रातील जनता आणि मराठ्यांची माफी मागितली. तसेच नयन पद्मसागर यांच्या वक्तव्य ही जैन समाजाचे नसून ते नयन पद्मसागर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले.
तसेच या वक्तव्यामुळे ताराराणी यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे ते म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याचा मार्ग दाखवावा लागेल असा इशाराही यांनी निलेशचंद्र मुनी नयपद्य सागर यांना दिला होता. तर नयन पद्मसागर यांच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व संस्थांवर तात्काळ बंदी घालवी अशी मागणी केली होती. या प्रकरणामुळे राज्यात सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात चर्चा रंगू लागली असतानाच आता निलेशचंद्र मुनी यांनीच वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात वादाला तोंड फोडले आहे.
निलेशचंद्र मुनी यांनी नितेश राणे यांची थेट शिवरायांसोबत तुलना केली आहे. नितेश राणेंची उंची शिवरायांनी एवढीच असून त्यांनी फक्त मंत्रीच नाही तर मुख्यमंत्री झाले पाहिजेत असेही निलेशचंद्र मुनी यांनी म्हटलं आहे. तर जेव्हा मालवणीमध्ये, मालेगावमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला, जातीय तेढ निर्माण झाला. तेव्हा तेथे कोणं नाही, नितेश राणे आले. त्यामुळे नितेश राणे यांचे आधी अभिनंदन कराला हवं. तर जशी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका होती, तशीच भूमिका नितेश राणेंची राहिली.
तर आपण स्वप्न पाहणाऱ्यांना सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराज नितेश राणे यांच्यांत आहेत. नितेश राणे यांची उंचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यांसारखीच आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्याशी ईर्षा करू नका, कायद्यात राहालं तर फायद्यात राहाल, असंही ते म्हणाले आहेत.
1. नवा वाद कशामुळे सुरू झाला?
निलेशचंद्र मुनींनी नितेश राणेंची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे वाद सुरू झाला.
2. याआधी कोणत्या वक्तव्यामुळे वाद झाला होता?
नयपद्य सागर यांनी महाराणी ताराराणी जैन असल्याचे म्हटल्यामुळे वाद झाला होता.
3. या वक्तव्यावर प्रतिक्रिया कोणी दिली?
संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
4. जैन समाजाची भूमिका काय आहे?
हे वक्तव्य वैयक्तिक असून संपूर्ण समाजाचे मत नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
5. या वादाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय वातावरण आणखी तापण्याची आणि चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.