
सिंधुदुर्ग: भाजपचे आमदार नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना कोठडीतील मुक्काम वाढला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar pass away) यांच्या निधनामुळे आज (सोमवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलली आहे.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.
नितेश राणेंच्या नियमित जामीनावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. पण मात्र आज सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आजचे न्यायालयाचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या नियमित जामीनावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दोन दिवसाची पोलीस कोठडी आणि त्यानंतर च्या घडामोडी नंतर नितेश राणेंची (Nitesh Rane) तब्येत बिघडली होती. गेले दोन दिवस नितेश राणे जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. चार दिवसांपासून राणे न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस कोठडीतून सुटका झाल्यामुळे नितेश राणे जामीन अर्जासाठी धावाधाव करत आहे. पण, रविवारची सुट्टी आल्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलण्यात आली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. आज (सोमवारी) नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत सुनावणी होणार होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. पण, रविवारी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यामुळे आज राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ता. ४ फेब्रुवारीला राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. जेलमध्ये न जाता राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. छातीत दुखत असल्या राणे यांनी सांगितले. सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात हृदय रोग तज्ज्ञ नसल्याने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली. मुंबईत पाठवलेले वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. दुसरीकडे नितेश राणे यांना जामीन मिळावा या करता त्यांचे वकील सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात गेले खरे मात्र तपास अधिकारी उपस्थित राहिले नाही आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे, असा अर्ज केल्याने नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक खंडाजंगी झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.