हत्तीची गरज काय तुम्ही उडी मारली तरी मी चिरडुन जाईन ; शिवेंद्रराजेंनी डिवचलं

साता-यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेचं जबाबदार आहेत.
Udayan Raje Bhosle, shivendra raje
Udayan Raje Bhosle, shivendra rajesarkarnama
Published on
Updated on

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle), आमदार शिवेंद्रराजे (shivendra) यांच्यातील विस्तव अजून गेलेला नाही, एकमेकांवर हल्लाबोल करण्याची संधी हे दोन्ही नेते कधीही सोडत नाही. कधी टोलनाक्यावरून तर मग कधी साध्या दारूच्या दुकानावरून अनेकदा वाद रंगलाय. साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनीवरुन आता दोन्ही राजांमध्ये जुंपली आहे. सध्याची स्थिती पाहता आणखी काही वर्षेही हे असेच चालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उदयराजेंवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंचा (Udayan Raje Bhosle) चांगलाच समाचार घेतला. ''मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडुन जाईन,'' असा टोला त्यांनी लगावला. पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय करणा-या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं पाहिजे,'' असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंचे नाव न घेता केलं होते. त्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवेंद्रराजे म्हणाले, ''साता-यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेचं जबाबदार आहेत. कारखानदारांकडुन हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळे सुद्धा साता-यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघुन गेल्या आहेत. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपुर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे आहेत,''

Udayan Raje Bhosle, shivendra raje
लतादीदी, शरद पवार अन् स्मृतीचिन्हाचे छायाचित्र!

यापूर्वीही शिवेंद्रराजेंनी अन् उदयनराजेंना यांनी एकमेंकांवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे. शिवेंद्रराजेंनी त्यांना नारळफोड्याची उपमा दिली होती. त्याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिले होते.

शिवेंद्रराजेंची बुद्धी छोट्या मुलांच्या पेक्षासुद्धा कमी आहे, असा टोला त्यांना हाणला होता. शिवेंद्रराजे हे बालीश विधानं करत असल्याचं सांगत त्यांनी टीका करताना भान राखायला हवं असं उदयनराजे म्हणाले होते. गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही राजे अनेकदा आमनसामने आले आहेत. कधी टोलनाक्यावरून तर मग कधी साध्या दारूच्या दुकानावरून अनेकदा वाद रंगलाय. आत्ताची स्थिती पाहता आणखी काही वर्षेही हे असेच चालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com