आता कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर युती नाही : राष्ट्रवादीचा निर्धार

जे भाजपला जमले नाही ते राष्ट्रवादीने केले.
BJP-NCP
BJP-NCPSarkarnama
Published on
Updated on

बदलापूर : आगामी कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बदलापूरमध्ये रविवारी (ता. १७) राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. आगामी निवडणुकीनिमित्त आघाडीसाठी प्रयत्न करूच; पण आघाडी झाली नाही, तरी भाजपसोबत युती मात्र करणार नाही, असे स्पष्ट संकेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख यांनी या वेळी दिले. (Now any Situation No alliance with BJP : NCP's decision)

बदलापूर पूर्वेतील काटदरे सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशीष दामले उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

BJP-NCP
इंदापूरची जनता कोणाची झोप उडविणार...हर्षवर्धन पाटील की दत्तात्रेय भरणे?

कोविडमुळे दोन वर्षे पुढे सरकलेला बदलापूर पालिका निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे पक्ष मेळावे, सामाजिक उपक्रम यांची नांदी शहरात पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून आयोजित केलेल्या या मेळाव्यात कॅप्टन आशीष दामले यांच्या मातोश्री व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या दर्शना दामले, पत्नी प्रियांका दामले, महिला शहराध्यक्षा अनिसा खान, अनघा वारंग, अनिल मराडे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कालिदास देशमुख यांनी कोरोना काळात पक्षाच्या कामगिरीचा दाखला दिला.

BJP-NCP
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना ठार मारण्याची धमकी; शिरूरमध्ये खळबळ

जे भाजपला जमले नाही ते राष्ट्रवादीने केले. अवघ्या ३०० रुपयांत नागरिकांसाठी लसीकरण शिबिर राबवले असून, साधारण १५०० नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. याच सामाजिक उपक्रमांच्या जोरावर ही आगामी निवडणूक लढवायची आहे, असे देशमुख यांनी सांगितले. शहरात राष्ट्रवादीची ताकद आता वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवायची; परंतु वेळ पडली, तर आघाडी करण्याची तयारी आहे; मात्र काहीही झाले, तरी भाजपसोबत युती करणार नाही, असे स्पष्ट संकेतही देशमुख यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com