एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री परबांचे महत्वाचे विधान

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे
Anil Parab
Anil ParabSarkarnama

कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांवर दिवाळीनंतर शासनस्तरावर चर्चा घडवून आणली जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या व अघोषित संपाला लगाम बसला आहे. (Post-Diwali discussion on demands of ST workers: Anil Parab)

एसटी महामंडळातील विविध १७ संघटनांच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्यामध्ये उपोषण सुरू केले होते. दोन दिवस सुरू झालेल्या उपोषणाला राज्याच्या विविध भागांमध्ये वेगळे वळण लागले. काही एसटी आगारात पुकारलेला संप चिघळत गेला होता. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व दिवाळी भेट देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर संघटनांचा संप मागे घेतला होता. मात्र, भाजपप्रणित काही संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. आपल्या विविध मागण्यांसाठी सोबत एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे. यासाठी हा अघोषित संप पुकारला होता. यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती.

Anil Parab
एसटी कर्मचाऱ्यांनो आत्महत्येचा मार्ग नको; संघर्ष करून न्याय मिळवू...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संपाचा कोणताही परिणाम झाला नव्हता. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही असंतोष आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर एसटीची सेवा पूर्वपदावर येत असताना विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्यात झालेला संप हा चुकीच्या पद्धतीने होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे काही संघटनांना धक्का बसला असला तरी भविष्यात एसटीला सकारात्मकदृष्ट्या पुढे घेऊन जाण्याचा विचार परब यांनी व्यक्त केला आहे.

Anil Parab
...अन्यथा राज्यात असंतोषाचा उद्रेक होईल : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा

कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे

राज्यातील २९ डेपोवर संपाचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या कर्मचारी पुकारलेल्या संपाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत हा संप करण्यास मनाई केली आहे, त्यामुळे काही संघटनांना धक्का बसला आहे. मात्र, महामंडळाच्या वतीने परब यांनी कर्मचारी संघटनांकडे खुलासा केला आहे की, दिवाळीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली जाईल. आज अखेर अघोषित संपावर कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रुजू व्हावे, असे आवाहनही परब यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com