मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत ३२ आत्महत्या झाल्या आहेत, यातून सरकारवर काहीही फरक पडलेला नाही. आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहेत. आता संघटीत होऊन संघर्ष करतच आपल्याला न्याय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येच मार्ग पत्करू नये. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, असे भावनिक आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटी कर्मचारी आत्महत्येचा मार्ग पत्करू लागले आहेत. याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करू नका. आम्ही वकिलांची फौज तुमच्या पाठीशी उभी करतो. आपण संघटीत होऊन संघर्ष करून न्याय मिळवायचा आहे, असे आवाहन केले आहे.
आमदार पडळकर म्हणाले, आज दिवाळी आहे. आजच्या दिवशी अंबडमध्ये एसटी कर्मचऱ्याने आत्महत्या केली आहे. तसेच वणी येथील कर्मचाऱ्याचा कारवाईच्या धसक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आजचा दिवस हा काळा दिवस आला आहे. सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा विषय न्यायालयाच्या कचाट्यात अडकवत आहे. आम्ही सर्वजण एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे आहोंत. वकिलांची फौज देखील आम्ही उभी करत आहोत. लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष सुरू आहे. त्याच्यासोबत आम्ही आहोत.
कसलीही अडचण येऊ देणार नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबून नये. आपला जीव व आपल्या कुटुंबाला पोरक करू नका. आजपर्यंत 31 ते 32 लोकांनी आत्महत्या केल्या. यातून तरी सरकारवर काय फरक पडला आहे का, असा प्रश्न करून श्री. पडळकर म्हणाले, सरकारचा रोजचा विषय चालूच आहे. आपल्या विषयाकडे ते जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहेत. आपल्याला संघटीत होऊन संघर्ष करत न्याय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबून नका, आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.