BJP district president election : सिंधुदर्गात भाजपने भाकरी फिरवलीच नाही; पुन्हा सावंत यांना संधी देत दुफळी टाळली

Sindhudurg BJP Prabhakar Sawant : राज्यभरात भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून काही ठिकाणी नव्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जुन्यांच्या अनुभवाला स्थान देण्यात आले आहे.
Sindhudurg BJP district president Prabhakar Sawant
Sindhudurg BJP district president Prabhakar Sawantsarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. 78 पैकी 58 नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या केल्या असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जुन्या जाणकारांवर विश्वास दाखवण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदर्ग जिल्ह्याचाही समावेश असून पुन्हा एकदा भाजपने विद्यमान अध्यक्ष प्रभाकर सावंत यांना संधी दिली आहे. यामुळे भाजपने जिल्ह्यात भाकरी फिरवलीच नाही अशी चर्चा रंगली आहे.

भारतीय जनता पक्षाने देशपातळीसह राज्यपातळीवर मोठे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्षासह राज्यातील प्रदेशाध्यक्ष देखील बदलण्यात येणार आहेत. पण त्याआधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडल अध्यक्षाच्या निवड करण्यात आल्या होत्या. तर आता रखडलेल्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या ही आज (ता.13) करण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रभाकर सावंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. राज्यभरातील अध्यक्षांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांनी जाहीर केली आहे. ज्यात सावंत यांना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. सावंत यांनी गेली दोन वर्षे चांगल्या कामाची छाप या जिल्ह्यात उमटवली आहे. त्यांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे यश मिळविले.

Sindhudurg BJP district president Prabhakar Sawant
BJP District President News : भाजपाचे मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर! निष्ठावंतांना दिले झुकते माप

राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असून या सुवर्ण काळात त्यांनी भाजपची प्रतिमा उंचावण्याचा चांगला प्रयत्न केला. तीन्ही विधानसभा मतदारसंघातील भाजप बुथ रचनेची बांधणी व भाजप सदस्यता अभियान नोंदणी कार्यक्रमातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे पक्षीय निवडणुकीत सावंत यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. ही चर्चा आता खरी ठरली असून त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे.

आगामी काळात जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुका असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, अतुल कळसेकर, अजित गोगटे, प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने भाजपला शतप्रतीशत यश मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

तसेच त्यांनी, मागील काळात जिल्हाध्यक्ष म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करता आले. या जिल्ह्यात पक्षीय चळवळ चांगल्या पद्धतीने उभी करता आली. गावागावातील विकासकामे व जनतेशी सुसंवाद या पदावर काम करताना साधता आला. तर आताही यापुढे जावून पक्षासाठी काम करता येईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

Sindhudurg BJP district president Prabhakar Sawant
Ahilyanagar BJP district president : मंत्री विखेंची सरकारसह संघटनेवर 'पकड'; 'दक्षिण', 'उत्तर' काबिज, तर 'नगर शहर' देखील टप्प्यात!

दरम्यान आता त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजपच्या जुन्या नव्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहणार आहे. सावंत हे संघाच्या मुशीत तयार झाले असल्याने ते भाजपमधील जुने कार्यकर्ते आहेत. तर नव्या कार्यकर्त्यांशी त्यांनी जुळवून घेत जिल्ह्यात भाजप वाढवण्याचे काम केलं आहे. याचा फायदा लोकसभेवेळी नारायण राणे यांना आणि विधानसभेवेळी नीतेश राणे यांनाही झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com