

Dilip Bhoir assault case : भाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात दाखल झालेले, दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 आरोपींना 12 वर्षांपूर्वीच्या (2012) चोंढी इथल्या मारहाणप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.
तर 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी धक्का मानला जात आहे. दिलीप भोईर हे रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार मानले जात होते.
चोंढी इथं 11 सप्टेंबर 2012 रोजी किरकोळ वादातून काँग्रेसचे (Congress) विजय थळे, रूपाली थळे व इतर कार्यकर्त्यांना भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर दिलीप भोईर यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले; मात्र उच्च न्यायालयाने तो फेटाळला होता.
रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे सभापती असताना पोलिस कोठडीत जाणारे ते पहिले सभापती ठरले होते. तब्बल 12 वर्षांनंतर, प्रधान जिल्हा न्यायाधीश राजेंद्र डी. सावंत यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आणि हा निकाल देण्यात आला. 25 आरोपींपैकी चार जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच भोईर यांना शिक्षा झाल्याने ते निवडणूक लढवू शकतील की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दिलीप भोईर यांच्याकडे रायगडच्या अलिबागमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी तथा रायगड जिल्हा परिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होते.
रायगडमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला हा धक्का आहे. स्थानिक वादातून दिलीप भोईर यांनी 2012 मध्ये अलिबाग तालुक्यातील चोंढी इथल्या संगणक प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढवला होता. दिलीप भोईर यांना शिक्षा ठोठावल्याने आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.