Raigad Voting Ban News : 13 वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने 8 हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार...

Lok Sabha Election 2024 : अनेकांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त 6 गावांमध्ये जवळपास 8 हजार मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबत इशारा दिला होता.
Raigad Voting Ban News : 13 वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने 8 हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार...
Published on
Updated on

Raigad News : आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. एकिकडे मतदानासाठी उत्साह असताना दुसरीकडे बाळगंगा प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणी आता मतदानावर निरुत्साह दिसून येत आहे. शासकीय अधिकारी यांनाही गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयश आले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण तालुक्याचे बाळगंगा प्रकल्पग्रस्त लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर कायम आहेत. आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला. 13 वर्षांपूर्वी सुरू झालेले हे धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झालंय. परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.

Raigad Voting Ban News : 13 वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने 8 हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार...
Solapur Lok Sabha : खबरदार...! मतदान करतानाचे फोटो/व्हिडिओ व्हायरल कराल, तर गुन्हा दाखल होणार
Raigad Voting Ban News : 13 वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने 8 हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार...
BJP Leader Threat : भाजपच्या पुण्यातील नेत्याला धमकी; व्हिडिओ व्हायरल करत राजकीय करिअर संपवण्याचा दिला इशारा

या धरण प्रकल्पांमध्ये अनेक जण विस्तापित झाले आहेत. अनेकांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त 6 गावांमध्ये जवळपास 8 हजार मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबत इशारा दिला होता. परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत. रायगड लोकसभा (Lok Sabha Election) मतदारसंघात आज 7 तारखेला मतदान होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com