Solapur Lok Sabha : खबरदार...! मतदान करतानाचे फोटो/व्हिडिओ व्हायरल कराल, तर गुन्हा दाखल होणार

Lok Sabha Election 2024 : मतदारांना ऊन लागू नये यासाठी सावली उभारण्यात आली आहे. मतदारांना बसण्यासाठी जागा तसेच, पिण्याचे पाणी, ओआरएसची पाकिटेही मतदान केंद्रावर असणार आहेत. त्यामुळे उष्णतेशी लढून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
Solapur Collector
Solapur CollectorSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 May : वाढत्या तापमानामुळे मतदानाची टक्केवारी घसरू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक मतदारसंघावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदारांना ऊन लागू नये यासाठी सावली उभारण्यात आली आहे. मतदारांना बसण्यासाठी जागा तसेच, पिण्याचे पाणी, ओआरएसची पाकिटेही मतदान केंद्रावर असणार आहेत. त्यामुळे उष्णतेशी लढून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

दरम्यान, काहीजण मतदान (Voting) करतानाचे फोटो अथवा व्हिडिओ काढून ते व्हायरल करतात. मतदान हे गुप्त असते, त्यामुळे मतदानाची गुप्तता ही सर्वांनी पाळलीच पाहिजे. मतदानाची गुप्तता भंग करणाऱ्यांवर आणि मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा सोलापूरचे (solapur) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Collector
Lok Sabha Voting In Solapur : सोलापूर जिल्ह्यात 3617 मतदान केंद्रांवर होणार मतदान; सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

लोकसभा मतदानाच्या (Loksabha Voting) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी (Collector) कुमार आशीर्वाद,पोलिस आयुक्त. एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अमृत नाटेकर यांनी मतदानाच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ही माहिती दिली.

उन्हामुळे यापूर्वीच्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी झाल्याचे दिसून आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून ४४ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदले जात आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा मतांच्या टक्केवारीवर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. त्यातून प्रत्येक केंद्रावर सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सकाळी सात सायंकाळी सहापर्यंत मतदान करता येणार आहे. त्यात मतदानासाठी विशेष सुविधांची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय असणार आहे. महिला आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्यात आलेली आहे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असतील तर प्रत्येक केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर करण्यात आला आहे.

Solapur Collector
Yamini Jadhav : यामिनी जाधव यांची स्थावर मालमत्ता पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढली

मतदान केंद्रावरील स्वच्छता गृहे वापरात यावीत, यासाठी प्रत्येक केंद्रावर पुरेशा प्रमाणात पाणीसाठा ठेवण्याची सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात आलेली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्यक्त केला.

Solapur Collector
Solapur Lok Sabha : प्रणिती शिंंदेंच्या प्रचारासाठी मराठा समाजाच्या समन्वयकाने वीस लाख घेतले; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com