Raj Thackeray News : 'राज'कीय सभेला परवानगी मिळणार की, नवं मैदान शोधावं लागणार? कुठे धडाडणार ठाकरी तोफ?

Raj Thackeray Rally In Kokan : सभेसाठी दुसऱ्या जागेची शोधाशोध ?
Raj Thackeray News :
Raj Thackeray News : Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Rally In Kokan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणामध्ये रत्नागिरी (Ratnagiri News) शहरात सभा होत आहे. मात्र या सभेसाठी पक्षाने जे मैदान निवडले आहे, त्या मैदानावर सभा करण्यासाठी संबंधित संस्थेने नकार दिला आहे. यामुळे मनसेची सभा होणार की नाही, या बाबत संदिग्धता आहे. मनसेच्या अडचण दूर होणार की नाही, याबाबतही चर्चा होत आहे.

Raj Thackeray News :
Karad APMC News : कराडला कॉंग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी-भाजप युती; पाटील, चव्हाण आमनेसामने

येत्या ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होणार असे मनसेकडून जाहीर करण्यात आलं होते, रत्नागिरी शहरातल्या एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर मनसेची सभा आयोजित करण्यात आले आहे. मात्र आज मनसेचे पदाधिकारी संबंधित संस्थेकडे मैदानासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना या राजकीय सभेसाठी नकार देण्यात आला.

याबाबत एक बाब विशेष म्हणजे या संस्थेने मागील १० वर्षांपासून या मैदानावर कोणत्याही राजकीय सभेला मैदान दिलेले नाही. त्यामुळे मनसेलाही आम्ही हे मैदान उपलब्ध करून देणार नाही, असं संस्थेकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मात्र मनसेने जवाहन मैदानावर सभा घेण्याचं निश्चित केलं आहे.

Raj Thackeray News :
Haveli Bazar Samiti : चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीवर अजितदादांचा ‘वॉच’

संस्थेच्या या ताठर भूमिकेमुळे मनसेला नवीन मैदान शोधावं लागू शकतं. यामुळे निर्णयामुळे फार कमी दिवसात आता नव्या मैदानात मनसेला सभेची तयारी करावी लागण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंची तोफ ६ मे रत्नागिरी येथे धडाडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com