Haveli Bazar Samiti : चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीवर अजितदादांचा ‘वॉच’

हवेली बाजार समिती ही केवळ तालुक्यापूरती मर्यादित नसून पुणे जिल्ह्याबरोबरच इतर अनेक जिल्ह्यावर प्रभाव टाकणारी संस्था आहे.
Haveli Bazar Samiti-Ajit Pawar
Haveli Bazar Samiti-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मांजरी खुर्द (जि. पुणे) : केवळ पुणे (Pune) जिल्ह्यालाच नव्हे; तर राज्याला उत्सुकता असलेल्या हवेली (Haveli) बाजार समितीची (Bazar Samiti) निवडणूक तब्बल १९ वर्षांनंतर होत आहे. चिन्ह वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला छत्री, तर अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीला कपबशी ही चिन्हे मिळाली आहेत. दोन्हीही पॅनेलने शुक्रवारी (ता. २१ एप्रिल) प्रचाराला सुरुवात केली आहे. पुढील आठ दिवस छत्री विरुद्ध कपबशी अशी चुरस पहायला मिळणार आहे. दरम्यान, चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही लक्ष घातले आहे. (Allotment of symbols to both the panels in Haveli Bazaar Committee Election)

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच खरे तर दोन गट मतदारांशी संपर्कात आहेत. गावोगावी बैठका घेऊन सोसायटी व ग्रामपंचायत गटाशी संबंधीत मतदारांना आपापल्या गटाची भूमिका पटवून देत आहेत. दरम्यान, अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडी पॅनेलने उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला मात्र इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे माघारीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर करावे लागले. चिन्ह मिळाल्यानंतर दोन्हीही पॅनेलने प्रचाराचा नारळ वाढवून चिन्हासह उमेदवारांना समोर आणले आहे.

Haveli Bazar Samiti-Ajit Pawar
Daund News : ठाकरे गटाला एकही जागा नाही; शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज : संजय राऊतांच्या सभेबाबत संभ्रम

राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने विरोधी अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीवर "ज्यांनी घोटाळे करून बाजार समिती १९ वर्षे प्रशासकाच्या ताब्यात सोपवली, तेच पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले आहेत.' असा आरोप करीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला जागतिक स्तरावर नेण्याचे अश्वासन देत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

विरोधी अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीने ‘संस्थेच्या सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन ही संस्था शेतकरी प्रतिनिधींच्या माध्यमातून चालविली जावी, यासाठी न्यायालयीन लढाई लढून निवडणूक लावण्यात आम्ही पुढाकार घेतला आहे' असे सांगत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे हवेली बाजार समितीची ही निवडणूक राज्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत अधिक लक्षवेधी राहणार आहे.

Haveli Bazar Samiti-Ajit Pawar
Ajit Pawar Interview ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवारांनी केला दावा

अजित पवारांचे राहणार विशेष लक्ष

जिल्ह्यातील जिल्हा बँकेसह विविध सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. हवेली बाजार समिती ही केवळ तालुक्यापूरती मर्यादित नसून पुणे जिल्ह्याबरोबरच इतर अनेक जिल्ह्यावर प्रभाव टाकणारी संस्था आहे. गेली १९ वर्षे प्रशासनाच्या ताब्यात असलेली आणि राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली गेलेली ही संस्था ताब्यात घेण्यासाठी दोन्हीही पॅनेलने जोरदार बांधणी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी स्वत: या समितीच्या निवडणूकीत विशेष लक्ष दिले आहे.

Haveli Bazar Samiti-Ajit Pawar
Ajit Pawar Interview : ‘शिंदेंच्या गाड्या थेट मातोश्रीवर आणा’; पण अधिकारी ‘लॉयल’ राहिला अन्‌ सत्ता परिवर्तन झाले! : अजितदादांनी उलगडला सूरतचा रस्ता

या आमदारांचा लागणार कस

हवेली तालुका शहराच्या चोहोबाजूंनी विस्तारलेला आहे. असे असले तरी तालुक्याचा पूर्व भाग अधिक ग्रामपंचायती व सोसायट्या असलेला भाग आहे. हा भाग शिरूर हवेली मतदारसंघात येतो. त्यामुळे येथे आमदार अशोक पवार यांच्यासह संजय जगताप चेतन तुपे, सुनील टिंगरे यांचा कस लागणार आहे.

व्यापारी-अडते व हमाल-तोलणार गटातील उमेदवारांवर लक्ष

व्यापारी-अडते व हमाल-तोलणार गटासाठीच्या तीनही जागांवर दोन्हीही पॅनेलने आपले उमेदवार दिलेले नाहीत. मात्र, या जागांवर लढत असलेल्या सतरा उमेदवारांपैकी तिघांना निश्चितपणे आपला छुपा पाठिंबा दोन्हीही पॅनेलने दिला आहे. त्या उमेदवारांच्या मदतीसाठीही दोन्हीही पॅनेलकडून लक्ष ठेवले जात आहे. ते तिघे कोण आणि कोणाचे हे निकालानंतरच समोर येईल.

Haveli Bazar Samiti-Ajit Pawar
Ajit Pawar Warning To Opposition : कुणाला मस्ती आली, तर ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे : अजित पवारांचा खणखणीत इशारा

ठळक मुद्दे

  • तब्बल १९ वर्षानंतर होतेय हवेली बाजार समितीची निवडणूक

  • एकूण जागा १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात

  • सेवा सहकारी मतदारसंघातील ११ जागांसाठी २९ उमेदवार

  • ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागांसाठी ११ उमेदवार

  • व्यापारी-अडते गटातील २ जागांसाठी १२ उमेदवार

  • हमाल-तोलणार गटातील एका जागेसाठी ५ उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com