Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan RaneSarkarnama

Narayan Rane: बाळासाहेब ठाकरेंची शपथ मोडून राणेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा 'तो' किस्सा; म्हणाले...

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: चिपळूणमधील एका सभेत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांची शपथ मोडून काही गोष्टींचा खुलासा करणार आहे असल्याचं सांगितलं.

Narayan Rane On Uddhav Thackeray: भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही. या दोन्ही नेत्यांकडून वारंवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशातच आता लोकसभेच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. 'उद्धवने मला आयुष्यात सर्वात जास्त त्रास दिला,' असं मला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, असा दावा करत राणेंनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

चिपळूणमधील एका सभेत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शपथ मोडून काही गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं. या वेळी त्यांनी उद्धवने मला आयुष्यात सर्वात जास्त त्रास दिला आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट केला. राणे म्हणाले, "बाप चोरला म्हणून बोंबा मारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाळासाहेबांना जिवंतपणी प्रचंड त्रास दिला, तिसरा मजला सोडून कधी दुसऱ्या मजल्यावर ते आलेच नाहीत. 21 दिवस परदेशात जाऊन एखादा फोन करण्याचे सौजन्य उद्धव यांनी दाखवलं नाही," असे आरोप राणे यांनी या वेळी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्या जास्त वाटेत जाऊ नको, अन्यथा लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) शिवाजी पार्कवर सभा घेऊन सगळे कारनामे उघड करेन, असा थेट इशाराच नारायण राणे यांनी ठाकरेंना दिला. शिवाय दोन वेळा मातोश्री सोडून गेलेल्या उद्धव ठाकरेंना मी घरी परत आणलं असून मी बोलतो ते असत्य असेल तर तसं उद्धव ठाकरेंनी सांगावं, असं आव्हानच राणेंनी या सभेत दिलं. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील (Narendra Modi) टीका सहन करणार नसल्याचंही राणे या वेळी म्हणाले.

Uddhav Thackeray, Narayan Rane
Devendra Fadnavis News : "माळशिरसला दहशतीतून मुक्त करणार"; फडणवीसांचा मोहिते-पाटलांना थेट इशारा

'उबाठा' म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं

रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) नारायण राणे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राणे यांनी रत्नागिरीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या वेळी ते सतत उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. अशातच उद्धव ठाकरेदेखील कोकण दौऱ्यावर ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. याच पार्श्वभूमीवर बोलताना राणे म्हणाले, योगायोग बघा इथं महायुतीची सभा आणि तिकडं उबाठाची जाहीर सभा, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, असं म्हणतो, कारण उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरेंना डिवचलं.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com