
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी झाली होती.
भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना गळ घातली होती.
खेडेकर भाजप प्रवेश करणार निश्चित झाले होते.
आज (ता. ४) होणारा भाजप प्रवेश अचानक रखडला.
या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Ratnagiri News : तळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यासह तिघांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातून हाकालपट्टी केली होती. यामुळे आगामी स्थानिकच्या तोंडावर तळ कोकणातील राजकारणात खळबळ उडाली होती. यादरम्यान त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजपने गळ घातली होती. मात्र डाव साधला तो भाजपने. खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चिक झाले होते. त्यांचा आज (ता.4) पक्ष प्रवेश होणार होता. मात्र आता तो रखडला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून नेमकं कारण काय असा सवाल आता त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
दरम्यान भाजप प्रवेश रखडल्याचा चर्चांना उत्तर देताना खेडेकर यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आज होणारा भाजप प्रवेश स्थगित करण्यात आला असून ओबीसी आरक्षण विषयक वाद चिघळू लागल्याने व कोकणातील नेतृत्व नारायण राणे यांची प्रकृती ठीक नसल्याने हा निर्णय घेण्यात सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोकणातील भाजपचे नेते नितेश राणे यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याच्या उपस्थितीत खेडेकर यांचा भाजप प्रवेश होणार होता. त्यासाठी खेडेकर समर्थकांनी मोठी तयारी केली होती. मात्र आज अचानक सकाळी तो थांबण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच पुढची तारीख लवकरच कळवली जाईल अशीही माहिती त्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
खेडेचे माजी नराध्यक्ष तथा मनसे नेते खेडेकर यांनी तळ कोकणात मोठ्या प्रमाणात मनसे तळागाळात पोहचवली. खेडमध्ये पहिल्यांदाच मनसेचा नराध्यक्ष तोही थेट जनतेतून निवडून गेला. पण इतके केल्यानंतर फक्त भाजप नेते नितेश राणेंशी भेट घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पक्षाकडून झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर तळ कोकणात खळबळ उडाली होती. ज्यानंतर खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करत लवकरच राजकीय निर्णय घेवू असा इशारा दिला होता.
ज्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले होते. कोकणात खेडेकर समर्थकांकडूनही प्रवेशाची जय्यत तयारी केली जात होती. त्यामुळे वातावरण निर्मितीही केली गेली होती. आम्ही निघतोय... तुम्ही येता का? असे मॅसेज व्हारल केले जात होते. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा गाजणार अशीच चर्चा रंगली होती. मात्र अचानक कार्यक्रम रद्द झाला. त्यामागे कोकणातील काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते असून त्यांनी पक्ष श्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतरच त्यांचा भाजप पक्ष प्रवेश थांबवला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या सर्व चर्चांना धुडकावून लावताना खेडेकर यांनी, भाजप प्रवेशाची तारीख ठरली होती. मात्र रवींद्र चव्हाण यांनी फोन करून तुमचा प्रवेश थांबवण्यात आला आहे. पण तो माझ्या उपस्थितीतच लवकर होईल, असे आश्वासन दिले आहे. तर नारायण राणे यांच्या प्रकृतीबाबतही काही अडचण असल्याने चार दिवसांनी जल्लोषात प्रवेश होईल, असेही सांगितल्याचे वैभव खेडेकर म्हणाले.
प्रश्न 1: वैभव खेडेकर कोण आहेत?
➡️ खेडचे माजी नगराध्यक्ष व माजी मनसे नेते आहेत.
प्रश्न 2: त्यांची मनसेतून हकालपट्टी का झाली?
➡️ पक्ष शिस्तभंगामुळे राज ठाकरे यांनी त्यांना हाकालपट्टी केली.
प्रश्न 3: भाजप प्रवेश कधी होणार होता?
➡️ ४ सप्टेंबर रोजी त्यांचा भाजप प्रवेश ठरला होता.
प्रश्न 4: प्रवेश का रखडला?
➡️ याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
प्रश्न 5: पुढे काय होऊ शकते?
➡️ खेडेकरांचा भाजप प्रवेश लवकरच निश्चित होईल अशी शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.