Jitendra Awhad On Barsu Refinery: 'बारसूच्या १०० % ग्रामस्थांचा विरोध, आंदोलन हलक्यात घेऊ नका'; आव्हाडांचा सरकारला इशारा..

Jitendra Awhad Tweet On Ratnagiri Barsu Refinery : 500-700 स्वतःच्या बोटी घेऊन मासेमारीला जाणारी लोक..
Jitendra Awhad Tweet On Ratnagiri Barsu Refinery
Jitendra Awhad Tweet On Ratnagiri Barsu RefinerySarkarnama
Published on
Updated on

Thane News : बारसू सोलगाव पंचक्रोशीतीलसर्वच १०० टक्के नागरिकांनी, त्या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. बारसूच्या ग्रामस्थांनी तीन महिन्यांपूर्वीच माझी भेट घेतली होती, अशा आशयाचं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.

'बारसू सोलगाव येथल्या पंचक्रोशीतील 100 टक्के नागरिकांनी या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. तेथील गावकऱ्यांनी 3 महिन्यापूर्वीच माझी भेट घेतली होती. त्या गावामधील जवळ जवळ 500-700 स्वतःच्या बोटी घेऊन मासेमारीला जाणारी लोक आहेत. गावामधील 100 टक्के लोकांनी या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे,' असा दावा आव्हाड यांनी केला आहे.

Jitendra Awhad Tweet On Ratnagiri Barsu Refinery
Rajaram Sugar Factory Election Result: पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर

आव्हाड पुढे म्हणाले, "याच प्रकरणातून विरोधातील लोकांचे समर्थन करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. गावामधील 100 टक्के लोकांचा जर विरोध असेल आणि ग्रामपंचायतीने देखील विरोधात ठराव केला असेल, तर तो प्रकल्प तिथे होऊ देऊ नका, असे कायद्यात म्हटले आहे.तरी देखिल जोरजबरदस्ती करून तो प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे."

दरम्यान, शशिकांत वारिशे यांची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली, हा उल्लेख देखील आव्हाडांनी ट्विट मध्ये केला आहे. यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी आहेत ? ही माहिती बाहेर आली तर ती मोठी धक्कादायक आहे. स्थानिकांचाच हा प्रकल्प राबवायला विरोध आहे. त्यांची मागणी आहे की, त्या ठिकाणी उत्कृष्ट आयटी पार्कची निर्मिती करावी. स्थानिकांना जे पाहिजे ते तिथे द्यायला हवं. त्यांच्या व्यथांचा सरकारने विचार करावा, असे आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad Tweet On Ratnagiri Barsu Refinery
Uday Samant On Barsu Refinery: रिफायनरी आंदोलनास्थळी पत्रकारांना पोलिसांची अरेरावी; मंत्री सामंत म्हणतात...

"5000 लोक माळरानावर बसले आहेत, हे कोकणचे आंदोलन आहे. कोकणी माणूस किती चिवट आहे ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे मोडीन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे .आंदोलन हलक्यात घेऊ नका," असा इशारा त्यांनी ट्विट करत दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com