Rajaram Sugar Factory Election Result: पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result: कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे..
Rajaram Sugar Factory Election:
Rajaram Sugar Factory Election:Sarkarnama

Kolhapur Political News:  छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी सुरु असून मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीतील दोन गटात (दोन टप्प्यात) मतमोजणी पार पडली. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली. काही तासांतच महादेवराव महाडिक यांची सत्ता कायम राहतेय की सतेज पाटील विजयाचा गुलाल उधळतात हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान पहिल्या फेरीतील दोन गटात झालेल्या मतमोजणीत महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत तर आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार महाडिक पॅनेलचे एकूण 5 उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी महाडिक गट शिवाजी रामा पाटील 3198 मते, सर्जेराव बाबुराव भंडारे यांना 3173 मते आणि अमल महादेवराव महाडिक 3358 मतांनी आघाडीवर आहेत. (Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result)

Rajaram Sugar Factory Election:
Satish Chaturvedi News : महाविकास आघाडीत पूर्व नागपूर शिवसेनेला मिळाला तर ज्युनिअर, नाहीतर सिनिअर चर्तुर्वेदी ?

तर विरोधी सतेज पाटील गटातील शिवाजी ज्ञानू किबिले 2261 मतांनी, दिलीप गणपतराव पाटील 2328 मतांनी आणि अभिजीत सर्जेराव माने 2184 मतांनी आघाडीवर आहेत.

माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस दिसत आहे. पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. गट क्रमांक1 पहिल्या फेरी अखेर आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलच्या बेनाडे शालन बाबुराव यांना 2441 मते पडली असून भोसले किरण बाबासो यांना 2413 मते पडली आहेत. तर आमदार महाडिक पॅनेलच्या विजय भोसले यांना 3244 आणि संजय मगदूम यांना 3169 मते पडली आहेत.  (Kolhapur Sugar Factory Elelction)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com