Ramdas Kadam: माझेही नाव रामदास कदम आहे...; भाजपला सज्जड दम; निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी

Konkan Politics : मी आता यापेक्षा अधिक काही बोलणार नाही, लोकसभेला तिकीट वाटप जाहीर होतील त्यानंतर मी माझं वैयक्तिक मत काय आहे ते महाराष्ट्रासमोर व्यक्त करणार.
Ramdas Kadam
Ramdas KadamSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असतानाच महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपावरून नेत्यांमध्येच वादंग निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) रायगड, मावळ व संभाजीनगर या ठिकाणी भाजपाकडून अत्यंत घृणास्पद काम सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या कामावरती व त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रात भाजपसोबत आलो आहोत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करीत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, लक्षात ठेवा मीही 25 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो आहे.

मी आता यापेक्षा अधिक काही बोलणार नाही, लोकसभेला तिकीट वाटप जाहीर होतील त्यानंतर मी माझं वैयक्तिक मत काय आहे ते महाराष्ट्रासमोर व्यक्त करणार,असाही खळबळजनक इशारा कदम यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीचे ज्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत, त्या ठिकाणी भाजपवाले प्रयत्न करीत आहेत. रायगड व रत्नागिरी सिंधुदुर्ग, मावळ तसेच संभाजीनगर या ठिकाणी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारासाठी भाजप प्रयत्न करीत आहेत.

ज्या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत, त्या ठिकाणी भाजपवाल्यांनी हा प्रयत्न जबरदस्तीने चालवला आहे. माझी अशी प्रामाणिकपणे इच्छा आहे की मोदीजींनी व शाह यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचे याबाबतीत कान पकडले पाहिजेत.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे, पण तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोकं तुमच्यासोबत आली आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यामध्ये या माध्यमातून आपण भाजपचा वेगळा मेसेज देत आहात याचे भानदेखील भाजपच्या काही लोकांना असणे हे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, अशा शब्दांत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना रामदास कदम यांनी खडेबोल सुनावले.

Ramdas Kadam
PM Modi: मोदींची भाषणं ऐका आता प्रादेशिक भाषेत; निवडणुकीच्या रणधुमाळीत AIची एन्ट्री

विधानसभेला भाजपने विरोधात काम केले

गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) भाजप युती असतानासुद्धा माझा मुलगा आमदार योगेश कदम यांच्या विरोधात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे काम करत राष्ट्रवादीला उघडपणे मतदान केलं.

इतकच नाही तर 2009 मध्ये मी गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उभा असताना मला भाजपवाल्यांनीच पाडले हे वास्तव आहे, अशीही मोठी खंत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी या वेळी बोलून दाखवत भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले.

योगेश कदमच्या विरोधात भाजप

आता महायुती आहे आम्ही विश्वास ठेवून इतका मोठा निर्णय घेतला आणि आतादेखील माझा मुलगा योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून बजेटमधील काम आणून आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम करीत आहेत.

जाणीवपूर्वक हेतूपुरस्सर त्रास दिला जात आहे.असे असेल तर भविष्यात भाजपवर (BJP) कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे, असे सांगत पुन्हा पुन्हा जर का भाजपकडून तेच तेच होणार असेल तर मग माझेही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा, असा सज्जड इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.

ठाकरेंवर टीकास्त्र

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वरही सडकून टीका केली. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपलं नाव जगात मोठं केलं उज्वल केलं, त्यांच्याबद्दल आदर तर सोडा मात्र रोज सकाळी उठल्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम उद्धवजींचा आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आला, याची खंत अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगाला वाटते. महाराष्ट्रात फिरत आहेत ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे, अन्यथा ते मातोश्री बाहेर पडत नव्हते. मंत्रालयात जात नव्हते अशा शब्दांत ठाकरेंचा रामदास कदम यांनी समाचार घेतला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com