Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Exit Poll 2024 : नारायण राणे आघाडीवर, एक्झिट पोलमध्ये काय अंदाज?

Narayan rane Ahead of Vinayak Raut in Lok Sabha Exit Poll 2024 : 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राणेंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला होता. आता त्यांना निवडणुकीत आघाडी मिळण्याची शक्यता TV 9 Pollstrat एक्झिट पोल मधून वर्तविण्यात आली आहे.
 Narayan rane Vinayak raut
Narayan rane Vinayak raut sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने उतरवले. त्यामुळे ठाकरेंच्या शिलेदार विनायक राऊत यांना ते धोबीपछाड देतील, असाच अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या नारायण राणे Narayan Rane विजयी होत असल्याचा अंदाज टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात येत आहे. कोकणात ठाकरेंना नेहमीच साथ मिळाली आहे. शिवसेनेच्या विरोधात जाणाऱ्या नारायाण राणेंना विधानसभा निवडणुकीत पहिला पराभव ठाकरेंचे शिलेदार वैभव नाईक यांच्याकडून 2014 ला पहिल्यांदा स्वीकारावा लागला होता. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेले राणे विजयी होताना दिसत आहेत.

पराभव झालेल्या राणेंनी पुन्हा काँग्रेसने Congress वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. या निवडणुकीत देखील राणेंना पराभावाचा सामना करावा लागला. राणेंना विधान परिषदेवर घेत त्यांचे काँग्रेसने पुनर्वसन केले. मात्र, पुढे 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राणेंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com