BJP Politics : बंडखोरी केलेल्या नेत्याचा भाजप प्रवेश, वेलकम स्वत: रवींद्र चव्हाणांनी केलं; युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता?

BJP cancelled Vishal Parab's Suspension : विधानसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे भाजपमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपल्याच नेत्यावर निलंबनाची कारवाई केली होती. ती आता मागे घेण्यात आली. तसेच त्यांचा थाटात प्रवेशही करून घेतला.
Vishal Parab rejoins BJP And Ravindra Chavan
Vishal Parab rejoins BJP And Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. विधानसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष लढल्याने निलंबित केलेल्या विशाल परब यांचे भाजपमध्ये पुनरागमन झाले.

  2. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत परब यांचा पक्षात पुनः प्रवेश करून स्वागत केले.

  3. सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या निर्णयामुळे युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे.

Sawantwadi News : तळ कोकणात सध्या मोठ्या घडामोडी होताना दिसत असून नुकताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील उद्योजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे राजकारण तापणारे विशाल परब यांची घरवापसी झाली. या प्रवेशामुळे आगामी काळात युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशाल परब यांचे विधानसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन आता मागे घेण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः परब यांना मुंबईत पक्षात परत घेतले. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग भाजप कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने चव्हाण पुन्हा एकदा भाजपच्या बांधणीला लागले असून राणेंना नको असणाऱ्या नेत्यांची मोठ बांधत असल्याची चर्चा आहे.

Vishal Parab rejoins BJP And Ravindra Chavan
उद्धव ठाकरे खरंच भाजपसोबत येणार? चव्हाण नेमकं काय म्हणाले पाहा? | Ravindra Chavan | Uddhav Thackeray

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने सावंतवाडीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली होती. येथून दीपक केसरकर यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं. पण विशाल परब यांनी अपक्ष उमेदवार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीत वाद निर्माण झाला होता. दरम्यान निकालात केसरकर यांनी मैदान मारले पण विशाल परब फक्त 34 हजार मतांवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईमुळे ते राजकारणाशी काहीसे दूर झाले होते. यात राणे कुटुंबाचा हात असल्याचीही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती.

पण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच रुसलेल्या कार्यकत्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. त्याचाच एक भाग म्हणून परब यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होईल, असा अंदाज सध्या बांधला जात आहे. तर भारतीय जनता पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठीच परब यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच चव्हाण यांनी, परब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत निलंबनानंतरही पक्षाचे काम सुरू ठेवले. त्यांच्या या निष्ठेचा विचार करून आणि कार्यकत्यांच्या आग्रहानंतर परब यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे जाहीर केले.

परब यांच्या परतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघा पैकी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिंदे सेनेच्या वाट्याला आला होता. या विधानसभा मतदारसंघांमध्ये दीपक केसरकर हे निवडणूक रिंगणात होते. युतीधर्म म्हणून भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी एकत्रित प्रचार यंत्रणा राबवणे आवश्यक होते.

मात्र विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडून फडणवीस यांच्यामधील एक टेलिक्लिप वायरल झाली होती. यामुळे परब यांची घरवापसी अनेकांना न पटणारी असेल. दरम्यान कार्यकर्त्यांच्या पक्षांतरावरून देखील भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटला आहे. भाजपने तर थेट प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडे शिवसेने विरोधात तक्रार केली आहे. यामुळे या प्रवेशावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Vishal Parab rejoins BJP And Ravindra Chavan
Ravindra Chavan: 'संविधान बचाव'ची 'शो'बाजी करणारे...; PM मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना रविंद्र चव्हाणांचं उत्तर

FAQs :

प्र.१: विशाल परब यांना भाजपमधून का निलंबित केले होते?
उ: विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दिल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते.

प्र.२: त्यांचे निलंबन कसे मागे घेण्यात आले?
उ: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतरीत्या त्यांना पुन्हा पक्षात घेतले.

प्र.३: या निर्णयाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल?
उ: सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत असला तरी युतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com