Ratnagiri Political News : सहदेव बेटकर करणार शिवसेनेची अडचण; युतीला बसणार फटका...

Sahdev Betkar सहदेव बेटकर शिवसेनेचे रत्नागिरीचे संपर्कप्रमुख असून त्यांनी आज रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना अपक्ष लढण्याचे संकेत दिले.
Uday Samant, Sahadev Betkar
Uday Samant, Sahadev Betkarsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : चिपळूण-संगमेश्वर किंवा गुहागर या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेनेचे सहदेव बेटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत मला भावासारखे आहेत. पण, मला विधानसभा लढवण्याची संधी मिळाली नाही तर, मी या दोन्हीपैकी एका मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि ठाकरे गट यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याबाबत आज बेटकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांपुढे आपली भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि पालकमंत्री उदय सामंत Uday Samant यांनी मला संपर्कप्रमुख पद दिले आहे. त्याचा उपयोग मी पक्ष वाढीसाठी करत आहे.

मी कधीही ठाकरे गटात जाणार असे वक्तव्य केलेले नाही. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत आहेत. यापूर्वी गुहागर मतदारसंघातून लढत दिली आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात ही मला मानणारे कार्यकर्ते आहेत.

समाजासाठी मला लढण गरजेचे आहे. मला संधी मिळाली नाही तर अपक्ष लढणार आहे, असेही ते म्हणाले. सहदेव बेटकर हे शिवसेनेचे रत्नागिरीचे संपर्कप्रमुख आहेत. त्यांच्या हा भूमिकेमुळे शिवसेनेसमोर आता आव्हान आहे. बंडखोरी झाल्यास युतीच्या मतात विभागणी होणार असल्याने त्याचा फटका युतीला बसू शकतो.

Edited By : Umesh Bambare

Uday Samant, Sahadev Betkar
Ratnagiri Sangameshwar News: उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा शिलेदार कोण? आज ठरणार उमेदवारी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com