

शक्तिपीठ महामार्गाच्या सध्याच्या आराखड्यावरून कोकण आणि सिंधुदुर्गावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रेडी बंदराला महामार्गाची जोडणी देण्याची मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
नागपूर ते गोवा मार्गामुळे कोकण पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
sindhudurg news : जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा कोकणासह विशेषतः सिंधुदुर्गावर अन्याय करणारा आहे. महामार्ग थेट गोव्याला जोडताना त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाच्या सध्याच्या ठरविलेल्या मार्गामुळे नागपूरहून येणारा पर्यटक थेट गोव्याला जाणार असेल तर हा कोकणवर अन्याय आहे. कोकणात उत्कृष्ट समुद्र किनारे, बंदर आहेत. त्यामुळे राज्यातील मालाची गोव्यात आवक-जावक का व्हावी, हा प्रश्न आहे. हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराला जोडला गेला पाहिजे.
हा रस्ता मुंबई-गोवा महामार्गाला छेदत असल्याने लोक पत्रादेवीला जाऊ शकतात. कोकणचा कोस्टल रोड विरारपासून इथे जोडला जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करून होणारा शक्तिपीठ मार्ग केवळ चंदगडवरून थेट गोव्याला जोडला जाऊ नये.
चंदगडला दुर्लक्षित करावे, असे आपले म्हणणे नसून, याच महामार्गाचा एक फाटा तिलारीमार्गे उत्तर गोव्याला अन् एक फाटा दक्षिण गोव्याला जोडल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक चंदगड अन् दोडामार्ग तालुक्यात वाढतील.
रेडी बंदरालाही एक फाटा जोडल्यास या भागाचाही विकास होणार आहे. त्यामुळे आपण या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना तशा प्रकारचे पत्र सादर केले आहे. निश्चितच ते या संदर्भात सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा आहे.
1. शक्तिपीठ महामार्गावर वाद का निर्माण झाला आहे?
सध्याच्या मार्गामुळे कोकण आणि सिंधुदुर्गावर अन्याय होत असल्याचा आरोप आहे.
2. दीपक केसरकर यांनी काय मागणी केली आहे?
महामार्गाचा एक फाटा रेडी बंदराला जोडण्याची मागणी केली आहे.
3. या मार्गाचा पर्यटनावर काय परिणाम होऊ शकतो?
पर्यटक थेट गोव्याला जात असल्याने कोकण पर्यटनावर परिणाम होऊ शकतो.
4. सरकारकडे काय मागणी करण्यात आली आहे?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
5. हा प्रकल्प कोणत्या भागासाठी महत्त्वाचा आहे?
कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.