मुंबई : अहो शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), इकडे लक्ष द्या. गुवाहाटीच्या राहिलेल्या चर्चा नंतर करा, असे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना सुनावले. त्याला शंभूराज देसाई यांनीही उत्तर दिले. ‘अहो, भास्करराव, तुमच्याच विषयावार चर्चा सुरू आहे. मागच्या सरकारमध्ये निधी मिळाला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्या उत्तरावर भास्कर जाधव अक्षरशः तुटून पडले. ‘अहो, शंभूराज काही तरी वाटलं पाहिजे, तुम्हाला. तुम्ही तर सरकारमध्ये मंत्री होता,’ असे जाधवांनी देसाईंना सुनावले. (Hey Shambhuraj Desai pay attention here; Discuss Guwahati later : Bhaskar Jadhav)
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेल्या ठरावावर बोलताना आमदार जाधव यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कोकणातील लोकांचे दोनच व्यवसाय आहेत. एक शेती आणि दुसरा मत्स्यव्यवसाय आहे. समुद्र किणारा हा कोकणाला लाभला आहे. मत्स्य मंत्री मात्र कोकणातले नाहीत. आता दादाजी भुसे आहेत, त्याआधी सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत यांना केलं होतं. यावरून सरकारची मानसिकता पाहायला मिळते आहे.
आमदार भास्कर जाधव विधानसभेत बोलत असताना शंभूराज देसाई हे बाकावर बसून बोलत होते. त्यावरून जाधव आणि देसाई यांच्यामध्ये विधानसभेतच जोरदार खडाजंगी झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यात देसाई हेही सहभागी झाले होते. हे बंडखोर प्रथम सूरत आणि तेथून गुवाहाटीला गेले होते. त्याचा संदर्भ घेऊन जाधवांनी देसाई यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे देसाई हे मागील महाविकास आघाडीत गृहराज्यमंत्री होते.
अजित पवारांनीही फटकारले होते
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मध्ये बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांना फटकारले होते. ‘एक मिनिट...आपण एकत्र काम केले आहे, शंभूराज देसाई. मध्ये बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला आहे. सध्या कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडला आहे. कशाचं सांगता पाऊस चांगला झाला आहे. दुष्काळच आहे ना? ओला दुष्काळ आहे ना? मी उदाहरण देत होतो. त्या काळामध्ये तुम्हालाही माहिती आहे. तुमच्याच मतदारसंघात विंग मिल उभा केल्या होत्या. त्यावेळी काहींनी यांचं पाती मोठी आहेत, ढग आडतील, असं सांगितलं होतं. काहीजण त्या ठिकाणची ती पाती तोडायलाही निघाले होते. लोकांच्या मनात कधी कधी अशा शंका येतात. त्यांना आपण समजून घ्यायचं असतं,’ असे त्यांनी देसाई यांना सुनावले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.