राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना कोकणातील 32 स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.
या मागणीमुळे कोकणातील विद्यार्थी, व्यावसायिक, तसेच रुग्ण प्रवास अधिक सुलभ होईल असे पवार यांनी नमूद केले आहे.
कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी यांसारख्या प्रमुख स्थानकांचा यात समावेश असून पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
Kokan News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तळकोकणातील पर्यटनाला चालना देण्यासह विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासाच्या संदर्भात महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहले आहे. ज्यात त्यांनी कोकणवासीयांचा रखडलेल्या प्रश्नाकडे वैष्णव यांचे लक्ष वेधत कुडाळ, कणकवली व सावंतवाडीसह 32 स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली आहे. तर आता या विनंतीकडे रेल्वेमंत्री कसे बघतात? कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळतो का हे लवकरच समोर येणार आहे.
शरद पवार यांनी आपल्या पत्रात, सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून, आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी ओळखला जातो.
मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबताच पुढे जातात. यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिकांसह पर्यटकांची अडचण लक्षात घेवून कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची देण्यात यावा.
या स्थानकांवर आपल्याला कायम स्वरूपी थांबे देता नाही आले तरी किमान प्रायोगिक तत्त्वावर याचा विचार करण्यात यावा. जसे की पर्यटन हंगाम आणि सणांच्या काळात (गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी) याची अंमलबजावणी करण्यात यावी अशीही विनंती शरद पवार यांनी केली आहे.
तसेच शरद पवार यांनी कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिल्यास याचा फायदा हा या भागातील पर्यटनाला होईल. विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासाची सोय देखील होईल. तर सामान्य जनतेच्या मागणीला न्याय मिळेल असे ते म्हणाले आहेत.
प्र.1: शरद पवार यांनी रेल्वे मंत्र्यांना कोणत्या विषयावर पत्र लिहिले?
👉 कोकणातील 32 स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत पत्र लिहिले आहे.
प्र.2: कोणती स्थानके या यादीत आहेत?
👉 कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि इतर 29 स्थानकांचा समावेश आहे.
प्र.3: या मागणीचा उद्देश काय आहे?
👉 विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण प्रवास सुलभ करणे आणि पर्यटन वाढविणे हा उद्देश आहे.
प्र.4: रेल्वे मंत्रालयाकडून यावर काही प्रतिक्रिया आली आहे का?
👉 अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.
प्र.5: या मागणीमुळे कोकणातील प्रवाशांना काय फायदा होईल?
👉 प्रवास वेळ कमी होईल, थेट गाड्या उपलब्ध होतील आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.