

महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढवण्याची घोषणा झाल्यानंतर शेकापने अलिबाग नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही घोषणा करताच ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण वाढल्याची येथे चर्चा आहे.
महाविकास आघाडीत उमेदवारीवरून तणाव आणि संभ्रम निर्माण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
Raigad News : शेतकरी कामगार पक्ष सध्या गंभीर अस्तित्वाच्या संकटातून जात असून 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले अनेक नगरसेवक सध्या भारतीय जनता पक्षात गेले आहेत. तर काही वाटेवर आहेत. यामुळे नव्याने निवडून येणारे प्रतिनिधी पक्षाशी कितपत निष्ठावान राहतील, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. तर सध्या निवडणुकीच्या तोंडावर शेकाप पूर्णपणे बँकफुटवर गेल्याचे चित्र आहे.
अशावेळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शेकाप भवन येथे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी घेतली. त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम करून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची आहे, असे आवाहन करताना स्मार्ट मूव्ह खेळला आहे. त्यांनी अलिबाग नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच शेकापकडून काही महत्वाच्या ठिकाणी नगरसेवकपदासाठी उमेदवारीची घोषणाही केली आहे. या घोषणेमुळे आता उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीची अडचण झाल्याचे येथे बोलले जात आहे.
राज्यात नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून स्थानिक स्तरावरील ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची असते. यासाठीच महायुतीसह महाविकास आघाडीने पूर्ण ताकदीने याला सामोरे जाण्याचे ठरवले आहे. पण जिल्ह्यात विधानसभेप्रमाणेच शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची महायुती होणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच येथे शेकाप आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग नगरपरिषदेत 20 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याप्रमाणे रविवारी येथील शेकापच्या भवनात बैठक पार पडली. यावेळी एक मुखाने शेकापच्या अक्षया नाईक यांची नराध्यक्षपदासाठी नाव जाहीर करण्यात आले.
तसेच यावेळी नगरसेवकपदासाठी उमेदवार म्हणून काँग्रेसचे समीर ठाकूर(वॉर्ड पाच) आणि अभय म्हामूणकर (वॉर्ड चार) यांची नावांची घोषणा करण्यात आली. अक्षया नाईक या अलिबागच्या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या असून त्या देखील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात.
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत 50 टक्के तरुणांना संधी दिली जाईल, शेकापसह आता महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेनं देखील ही निवडणूक मनावर घेतली आहे. त्यामुळेच आपल्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. पण प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम करून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी. महाविकास आघाडी एकत्र आल्याने आपला विजय हा निश्चित झाला आहे. मात्र, गाफील न राहता, काम करायचे आहे. प्रचारासाठी कालावधी कमी आहे. ही एकी अशीच ठेवून अलिबाग शहराची असलेली ओळख कायमच टिकवून ठेवा, असे आवाहन शेवटी जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आले असून आता महाविकास आघाडीतून निवडणूक लढविली जाणार असल्याचे ठाकरे पक्षातील संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी जाहीर केले होते. त्यांनी अलिबाग नगरपरिषदेच्या उमेदवारांबाबत शेकापच्या नेतेमंडळींसोबत चर्चा झाली असून वाटाघाटी चालू असल्याचे म्हटले होते. पण आता अलिबाग नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची अडचणी झाल्याची येथे चर्चा आहे.
1. शेकापने अलिबाग नगराध्यक्षपदासाठी कोणाचं नाव जाहीर केलं?
शेकापने अक्षया नाईक यांचे नाव अलिबाग नगराध्यक्षपदासाठी जाहीर केले आहे.
2. ही घोषणा कोणी केली?
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही घोषणा केली.
3. या निर्णयामुळे कोणता वाद निर्माण झाला आहे?
या निर्णयामुळे महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण वाढली असून तणाव निर्माण झाला आहे.
4. शिवसेनेची या निर्णयावर प्रतिक्रिया आली आहे का?
अद्याप शिवसेनेने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
5. अलिबाग निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र राहील का?
सध्या या घोषणेमुळे आघाडीत संभ्रम निर्माण झाला असून पुढील बैठकीनंतर निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.