Ganesh Festival 2023: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठं गिफ्ट; शिंदे सरकारने घेतला 'हा' निर्णय

Konkan News: शिंदे-फडणवीस-पवार सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठी खुशखबर दिली.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeSarkarnama

Mumbai News: गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक कोकणात जातात. या पार्श्वभूमीवरच आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

टोल माफी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी सह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाने या सवलतीचा निर्णय जारी केला.

टोलमाफीची सवलत कशी मिळणार ?

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिंदे सरकारने टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या टोलमाफी सवलतीसाठी 'गणेशोत्सव 2023 कोकण दर्शन' अशा आशयाचे स्टिकर्स स्वरूपाचे टोलमाफी पास, तसेच त्यावर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याबरोबरच कोकणात गेलेल्या गणेशभक्तांसाठी पुन्हा परतीच्या प्रवासाकरीता हाच पास ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Edited by - Ganesh Thombare

Chief Minister Eknath Shinde
Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी चौंडीत दहा दिवसांपासून उपोषण; सरकारचे दुर्लक्ष ? राम शिंदे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com