Raigad Politics : रायगडमध्ये शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात राजकीय चढाओढ ?

Lok Sabha election 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात आहे.
Aditi Tatkare, Sunil Tatkare and Bharat Gogawale
Aditi Tatkare, Sunil Tatkare and Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत, तर महायुती आणि आघाडीतील नेत्यांमध्ये विसंवाद होत असल्याचे समोर येऊ लागले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रायगड चांगलंच चर्चेत आहे. (Raigad Lok sabha 2024)

रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून आता दावा केला जात आहे, तर काही दिवसांपूर्वी रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याला मिळावं म्हणून भरत गोगावले यांनी दंड थोपटले होते. आमदार भरत गोगावले हे पालकमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते, पण शेवटी राजकीय गणितं बदलली आणि अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री झाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aditi Tatkare, Sunil Tatkare and Bharat Gogawale
Nashik Congress : दोन काँग्रेस नेत्यांमध्ये आर्थिक व्यवहारातून जुंपली; भाजपच्या हाती आयते कोलीत..!

यानंतर गोगावलेंची नाराजी उघडपणे समोर आली. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात राजकीय चढाओढ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने रायगड किल्ल्यावर मोठ्या जल्लोषात राष्ट्रवादीतर्फे सोहळा साजरा करण्यात आला.

तसेच राष्ट्रवादीकडून शिवजयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा आज समारोप झाला. या वेळी किल्ले रायगडावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी संपूर्ण रायगड परिसरात फक्त आणि फक्त तटकरेंचे बॅनर लागले होते.

तर आमदार भरत गोगावलेंच्या नावाचा केवळ एक बॅनर होता. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून रायगडवर आपलंच वर्चस्व असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवार गटात एक प्रकारे राजकीय चढाओढ सुरू असल्याचं बोललं जात आहे.

मंत्री अदिती तटकरेंची दांडी

स्वराज्य सप्ताहाची सुरुवात 12 फेब्रुवारीपासून मुंबई येथून सुरू झाली होती. या स्वराज्य सप्ताहाचा समारोप रायगडावर झाला. या वेळी रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. मात्र, मंत्री अदिती तटकरे या गैरहजर होत्या. त्यांच्या या गैरहजरीमुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Aditi Tatkare, Sunil Tatkare and Bharat Gogawale
Raj Thackeray : शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये; निवडणूक आयोग पाच वर्षे झोपा काढतं का ? राज ठाकरे भडकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com