Shiv sena : नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखांचा काही तासांतच राजीनामा

Shiv sena | नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
uddhav thackeray,  Prakash Rasal
uddhav thackeray, Prakash Rasal sarkarnama

रत्नागिरी : एकनाथ शिंदे गटात सामील झालेले उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून (shiv sena) हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. नियुक्तीनंतर काही तासातच कोकणात राजीनामा नाट्य रंगले आहे. त्यामुळे रत्नागिरीतून (ratnagiri) शिवसेनेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. (shiv sena latest news)

नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. कौंटुंबिक आणि आरोग्याचे कारण देत प्रकाश रसाळ यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे पाठवला आहे.

uddhav thackeray,  Prakash Rasal
Presidential Election 2022 : मुर्मू -सिन्हा यांच्यात लढत, आज मतदान

रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तीक आणि कौटुंबिक अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

यात उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप,शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर आणि महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना शिवसेनेतून हटविण्यात आले होते. रत्नागिरी नगरपरिषदेतील (ratnagiri municipal council) 23 पैकी 20 नगससेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com