Shivsena News : मोठी बातमी : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होणार?

Konkan News : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Vaibhav Naik News : कोकणामध्ये (Konkan) शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नियमीत राजकीय वाद होत असतात. त्यामुळे कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरून नाईक यांच्यावर कणकणवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कणकवली पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांच्या अत्यंत गुप्तपणे हालचाली सुरू, असल्याची माहिती मिळत आहे.

Uddhav Thackeray News
Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरातांची नेमकी नाराजी काय? पत्रातून महत्त्वाची माहीती आली समोर...

कणकवली तालुक्यातील केनेडी बाजापपेठेत २४ जानेवारीला शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर केनेडीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भाजपाचे अनेक कार्यकर्ते केनडी बाजारपेठेत दाखल झाले होते. तर शिवसेनेने देखील कार्यकर्त्यांची या ठिकाणी जमवाजमव केली होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयांवर चालून गेले होते.

पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा राडा अधिक चिघळण्याची शक्यता होती. आंगणेवाडीच्या जत्रेमुळे पोलिसांनी कारवाई केली नव्हती. मात्र, बंदोबस्ताचा ताण कमी झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील कनेडी राड्यामधील दोन्ही बाजूच्या काही संशयितांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

Uddhav Thackeray News
Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भाजप (BJP) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षाचे राजकीय नेते, पदाधिकारी आहेत. रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात सदर गुन्ह्यांमधील नावे नमूद असलेले दोन्ही पक्षांचे काही ठराविक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्वतःहून पोलिसात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. त्यामुळे काही कार्यकर्ते हजर झाल्याची माहिती आहे. त्यातच वैभव नाईक यांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com