Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरातांची नेमकी नाराजी काय? पत्रातून महत्त्वाची माहीती आली समोर...

बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्टींकडे पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Balasaheb Thorat News Today : काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षश्रेष्टींकडे पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर थोरात यांनी काँग्रेसच्या (Congress) विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिली आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

दरम्यान, थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात आपण पटोले यांच्यासोबत काम करु शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या विषयी इतका राग असेल तर पटोले यांच्याबरोबर काम करणे अवघड आहे. विधान परिषद निवडणुकीत राजकारण झाले. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्या ऐवजी ते वाढवण्यात आल्याचा आरोप, थोरात यांनी केला आहे.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

तसेच सार्वजनिकरीत्या कुटुंबा विरोधात वक्तव्य करण्यात आली. नगर मधील कार्यकर्त्यांनावर कारवाई झाली. यात कोठेही माझे मत विचारात घेतले नाही. सत्यजीत तांबे यांच्या संदर्भातील प्रकरण मिटवण्या ऐवजी वाढवण्यात आले. सत्यजित तांबे म्हणाले होते की माफी मागायला तयार होतो, पत्र पाठवले होते पण प्रदेशाध्यक्ष दुसऱ्याच उमेदवार घेऊन फिरत होते.

जिल्हाध्यक्ष कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली. याबाबत पक्षाने एकदाही विचारणा केली नाही. सुधीर तांबे सत्यजित तांबे यांना त्यांची बाजू मांडून न देता पक्षातून निलंबित केले गेले. या सर्व वेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी चर्चा केली नाही. खालच्या स्तरावरची विधान केली. इतका द्वेष नाना पटोले यांना आमच्या विषयी असेल तर त्यांच्या बरोबर काम करणे अशक्य नाही, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर अजित पवार म्हणाले, "त्यांना फोन केला होता..."

थोरात यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. थोरात हे काँग्रेसमधील ज्येष्ट नेते आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, असे असतानाही थोरात यांना पक्षाने डावले. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद काय वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com