Deepak Kesarkar : "शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होणार होते पण राऊतांनी...": केसरकरांचा गौप्यस्फोट

Political News : शिवसेना-भाजप युतीच्या सरकार स्थापनेबाबत मंत्री केसरकर यांनी मोठे विधान केले आहे.
Sanjy raut, Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Sanjy raut, Uddhav thackrey, Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट वेगळे झाल्यापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. विशेषतः खासदार संजय राऊत सर्वांवर चौफेर टीका करीत असतात त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले जाते. त्यातच शिवसेना-भाजप युतीच्या सरकार स्थापनेबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे.

मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा, मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि 370 कलम हटवून दाखवेन, असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते अन ते पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे. खरे तर संजय राऊत यांनी मोदींचं कौतुक केले पाहिजे. शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार ही बातमी संजय राऊत यांनी लीक केली होती. त्यावेळी राऊत गप्प राहिले असते तर युतीमध्ये फूट पडली नसती असाही हल्लाबोल केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केला.

Sanjy raut, Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Satara Loksabha : साताऱ्यातून पुन्हा उदयनराजेंनाच तिकिट द्यावे; भाजप लोकसभा प्रभारींची ‘मन की बात’

राम मंदिर शुभारंभाचा सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आमंत्रण दिले आहे. त्यांना देखील दुसऱ्या टप्प्यात दिले जाईल. हा कार्यक्रम समितीचा आहे आमचा नाही. भाजपा आणि शिवसेना युती ज्यांच्यामुळे तुटली त्यांना असल्या विषयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला असल्याचा आरोप केसरकर यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या मंत्री केसरकर यांनी माध्यमाशी संवाद साधला.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल. त्यासाठी महाराष्ट्र सरकार बांधील आहे. जातीच्या आरक्षणाबाबत घेतलेला कुठलाही निर्णय कोर्टात टिकला पाहिजे. ज्यांची कुणबी मराठा नोंदी आहेत. त्यासोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील वंशजांना आरक्षण देण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे. आणि ह्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याचे केसरकर यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या टीकेला दिले प्रत्युत्तर

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदार तोडून मोडून सरकार बनवल या टिकेचाही समाचार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतला आहे. संजय राऊत यांच्या वागण्यामुळेच आमदार बाहेर पडले. याला जबाबदार सर्वस्वी संजय राऊत आहेत. मीही उद्धव ठाकरे यांच्या जवळजवळ होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व हा मुद्दा घेऊनच भाजपा बरोबर सरकार बनवायचं होत, उद्धव ठाकरेचं म्हणन हिंदुत्वा बरोबरच जाण्याच होत. मात्र, त्यांची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत यांंनी केले असाही खळबळजळक आरोप केसकर यांनी केला.

उद्धव ठाकरे पुन्हा युतीत यायला तयार होते पण संजय राऊत यांना हे होऊ द्यायचं नव्हते. महाराष्ट्रात जर काही चांगले झाले तर संजय राऊत यांच्या पोटात का दुखते. त्यांनी असं वागु नये, त्यांना ही कळकळीची विनंती करण्यासही केसरकर यावेळी बोलताना विसरले नाहीत.

(Edited By - Sachin waghmare)

Sanjy raut, Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते; उलट तपासणीत केसरकर काय काय म्हणाले ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com