शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरी जाऊन घेतली भेट

राष्ट्रवादीमध्ये एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबूज गेले काही दिवस सुरू आहे.
Bhaskar Jadhav-Sanjay Kadam
Bhaskar Jadhav-Sanjay KadamSarkarnama
Published on
Updated on

चिपळूण (जि. रत्नागिरी) : गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी खेड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, हे मात्र समजू शकलेले नाही. पण, या भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह खेड व गुहागर तालुक्यात राजकीय चर्चा, तर्कवितर्क सुरू झाले आहेत. (Shiv Sena's Bhaskar Jadhav meet former NCP MLA Sanjay Kadam)

आमदार भास्कर जाधव हे खेड येथे रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांनी माजी आमदार कदम यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या वेळी संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम हेही उपस्थित होते. आमदार जाधव यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Bhaskar Jadhav-Sanjay Kadam
‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत मताला दहा हजारांचा भाव फुटल्याची चर्चा...

आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार संजय कदम हे एकेकाळी त्यांचे जवळचे सहकारी ओळखले जात होते. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेत गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या दोन कुणबी समाजातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला थेट आव्हान दिले होते. यामध्ये एका कुणबी नेत्याला विधान परिषदेवर घेण्याबाबत विचार करू, असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबूज गेले काही दिवस सुरू आहे.

Bhaskar Jadhav-Sanjay Kadam
खासदार होताच अवघ्या अडीच वर्षांतच अमोल कोल्हेंवर एकांतवासाची वेळ का आली?

तटकरे-जाधव यांच्यात शीतयुद्ध कायम

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात असलेले शीतयुद्ध संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला माहीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे विद्यमान भास्कर जाधव यांच्या भेटीला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत, त्यामुळे या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकारणात चर्चा रंगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com