पालघरमध्ये `शिवशक्ती`चा शिवसेनेला धक्का!

संजय पाटील (Sanjay Patil) बनले बोईसरचे किंग मेकर
Sanjay Patil Palghar
Sanjay Patil Palgharsarkarnama

विरार : नुकत्याच झालेल्या पालघर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत बोईसर भागात शिवशक्ती संघटनेच्या पाठींब्यांने उमेदवारांना विजय सहज शक्य झाला. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये शिवशक्तीचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे.

माजी आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असलेल्या संजय पाटील यांच्या शिवशक्ती संघटनेने नवापूर, सालवड, सरावली व मान येथील निवडून आलेल्या उमेदवारांना संघटनेने पाठिंबा दिला होता. निवडून आलेल्या मध्ये भाजप,मनसे आणि राष्ठ्रवादीचे उमेदवार असून त्यांनीच आपण शिवशक्तीमुळे निवडून आल्याचे सांगितल्याने येणाऱ्या दिवसात बोईसरमध्ये शिवशक्ती संघटना राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोठे आव्हान ठरणार आहे.

Sanjay Patil Palghar
जिल्हा परिषदेतील पराभवानंतर पालघर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील

शिवशक्ती संघटनेचा पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत विविध ठिकाणी विविध पक्षांना पाठिंबा दिला होता. संघटनेचे संजय पाटील यांनी नवापूरमध्ये तर आपलाच निष्ठावंत कार्यकर्ता मिलिंद वडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणुकीत उभे केले होते. याठिकाणी शिवसेनेचे मोठे आव्हान असताना देखील आपल्या जनसंपर्कावर त्यांना निवडून आणले.

पूर्वीचे सहकारी व पुन्हा संजय पाटील यांच्या सोबत आलेल्या सालवड येथील एस. एन. पाटील यांच्या कुटुंबातील मेघा पाटील यांना भाजपा मधून उमेदवारी शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील यांनी उमेदवारी मिळवून दिली होती. याठिकाणी देखील शिवसेनेचा बालेकिल्ला व जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण यांचे गाव असताना देखील याठिकाणी शिवसेनेचा मोठा पराभव भाजपचे उमेदवार मेघा पाटील यांनी केला असून याठिकाणी मोठा धक्का शिवसेनेच्या नेत्यांना बसला आहे.

Sanjay Patil Palghar
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेला फायदा, राष्ट्रवादीची आकडेमोड...

सरावली पंचायत समिती व सरावली (अवधनगर) या दोन्ही ठिकाणी शिवसेनेविरूद्ध उभे असलेल्या भाजपच्या उमेदवारांना शिवशक्तीचा मोठा पाठिंबा होता. याठिकाणी संजय पाटील यांचे खंदे समर्थक नापेश संखे यांच्या पत्नी निर्मीती नापेश संखे यांना उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणी काही मतांच्या फरकाने भाजपचा उमेदवारांचा पराभव झाला असला तरी याठिकाणी पहिल्यांदा मिळालेली मतांची आकडेवारी येणाऱ्या काळात शिवसेनेच्या नेत्यांना आपले अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी पुरेशी आहे.

सरावली पंचायत समिती गणात वैभवी राऊत यांना प्रभाकर राऊत यांच्या हट्टापायी शिवसेनेच्या संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी उमेदवारी दिली मात्र याठिकाणी शिवशक्तीच्या पाठींब्यावर उभा असलेल्या भाजपाच्या रेखा सकपाळ यांचा विजय झाला. शिवसेनेेच्या पूर्वपार चालत आलेल्या सत्ताकारणाला धक्का बसला आहे. शिवशक्ती संघटनेने मान येथील मनसेच्या उमेदवारांना देखील पाठिंबा दिला होता. येथील मनसेच्या उमेदवार तृप्ती पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मनसेचे पदाधिकारी यांनी याबाबत संजय पाटील यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. यातच सरावली येथील भाजपचे विजयी उमेदवार रेखा सकपाळ यांनी देखील संजय पाटील यांची भेट घेवून आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी सरावली गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार मिलिंद वडे यांनी देखील आपल्या नेत्यांचे आर्शिवाद घेत शिवशक्ती संघटनेची ताकद दाखवली आहे. शिवशक्तीचे संजय पाटील हे या पोटनिवडणुकीत `किंग मेकर` झाल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण निवडणुकीत शिवशक्ती संघटनेचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. यामुळे येणाऱ्या काळात बोईसर भागात सेनेला शिवशक्तीचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com