हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा : वैभव नाईकांचे राणेंना आव्हान

आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव केला होता.
Nilesh Rane-Vaibhav Naik
Nilesh Rane-Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : हिंमत असेल तर माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांची माझ्याविरोधात कुडाळ (Kudal) विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे राहावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी राणेंना दिले. (Show by contesting elections against me : Vaibhav Naik's challenge to nilesh Rane)

आमदार नाईक आणि भास्कर जाधव यांच्यावर कुडाळ येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, नीलेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याला आमदार नाईक यांनी उत्तर दिले.

Nilesh Rane-Vaibhav Naik
साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडेंसारखा खमका अधिकारी नेमा : पंढरपूरच्या ऊस परिषदेत ठराव

आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव केला होता. आता त्यांनी राणेंचे सुपुत्र, माजी खासदार नीलेश राणे यांना आव्हान दिले आहे. नीलेश राणे हे आता नाईक यांचे आव्हान स्वीकारतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Nilesh Rane-Vaibhav Naik
बीडच्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून दिवाळी गिफ्ट; ५७ कोटी रुपये बॅंक खात्यात जमा

आमदार नाईक म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी काढलेल्या अघोषित आणीबाणीच्या विरोधातील मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपने काल संविधानाला समर्थन देण्यासाठी मोर्चा काढला. मात्र, त्यात त्यांनी संविधानाला विरोध करण्याचेच काम केले. देशात अघोषित आणीबाणी असल्याचा प्रत्यय भाजपच्या रॅलीत दिसून आला आहे, अशी टीकाही नाईक यांनी केली.

Nilesh Rane-Vaibhav Naik
घोडगंगा निवडणूक : आमदार अशोक पवारांना भाजप फराटेंच्या नेतृत्वात देणार टक्कर

नारायण राणेंची ताकद सिंधुदुर्गमधून संपलेली आहे, तरीही नीलेश राणे भाषणातून ‘याला लोळवू, त्याला लोळवू’ची भाषा करतात. एवढीच हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात कुडाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवावी. मग कोण कुणाला लोळवतोय आणि कुठली जनता कुणाला धूळ चारतेय, ते पाहून घेऊ. राणे निवडणूक रिंगणातून पळ काढल्याशिवाय राहणार नाहीत, याची मला खात्री आहे, असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

Nilesh Rane-Vaibhav Naik
शिवसेनेतून हकालपट्टीनंतर क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘त्यात गैर काय...?’

संविधान बचाव रॅलीसाठी कुडाळमध्ये आलेले भाजपचे सर्वच नेते पडेल होते. त्यातील एकही नेता जनतेमधून निवडून आलेला नव्हता. त्यांनी आमक्याला जेलमध्ये टाकू, तमक्याला जेलमध्ये घालू, अशा धमक्याच दिल्या. त्यालाच आमचा विरोध आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये गेलेले अनेक नेते ‘शुद्ध’ झाले; मात्र जे गेले नाहीत त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे, असे ठणकावले होते. त्या प्रवृत्तीला लोकशाही मार्गाने विरोध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला होता, असेही नाईक यांनी सांगितले.

भास्कर जाधव काय चुकीचे बोलले? एखाद्यावर अगोदर आरोप करायचे आणि त्या आरोपांना संबंधितांनी उत्तर दिले की थयथयाट करायचा, हे काही योग्य नाही. आमदार जाधव यांचा महिनाभरानंतर पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा दौरा होणार आहे, असा इशारा देऊन वैभव नाईक म्हणाले की, ‘‘आमदार नीतेश राणे यांनी माझ्या मालमत्तेसंबंधी माध्यमांसमोर दाखविलेले तीनही कागद ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र, चौथा कागद दाखविला, ती मालमत्ता कुठे आहे? माझ्या मालमत्तेमधला एक जरी रुपया अधिकचा असेल, तर मी कारवाईस तयार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com