Sunil tatkare : तटकरेंविरोधात नाराजीचा स्फोट : आरोपांचा बॉम्ब टाकून खंद्या समर्थकाने सोडली साथ; ठाकरेंच्या सेनेला पाठिंबा

Sunil tatkare : राष्ट्रवादीत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत भगत यांनी तटकरे गटावर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Uddhav Thakrey, Sunil Tatkare
Uddhav Thakrey, Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Shrivardhan News : श्रीवर्धन नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक चंद्रकांत भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सातत्याने डावलून प्रत्येक ठिकाणी मर्जीतील व्यक्तींना संधी ही खदखद श्रीवर्धन तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुन्या जाणत्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता लांगुलचालन करणाऱ्यांवर विश्वास ठेवून उमेदवारी जाहीर केली गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून तालुक्यात पक्षवाढीसाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. श्रीवर्धन नगर परिषदेचे चंद्रकांत महादेव भगत यांनी पक्षात सतत डावलले जात असल्याने व खासदार, आमदारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Uddhav Thakrey, Sunil Tatkare
Sunil Tatkare : रायगडच्या रोह्यात तटकरेंची हुकूमत शिंदेंचा शिलेदार मोडून काढणार? राष्ट्रवादीविरोधात भाजपची शिवसेनेला रसद?

आमदार-खासदारांवर नाराजी

नगर परिषद निवडणुकीच्या वेळेस मी व माझ्या सहकारी, कार्यकर्ताचा ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा आहे. अतुल चौगुले हे नगराध्यक्षपदी योग्य उमेदवार असून, उर्वरित २० नगरसेवक उमेदवार विजयी करणे, हे आपले ध्येय असल्याचे भगत यांनी सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन येथील अनेक कार्यकर्ते हे खासदार व आमदार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत असून, लवकरच ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत.

Uddhav Thakrey, Sunil Tatkare
kokan Politics : तळकोकणात भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची खेळी? विरोधकांबरोबर युतीची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत भगत यांनी सांगितले २०१२ मध्ये मी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेतले, मात्र २०१८ नंतर पक्षाने माझ्यावर कोणतीही पक्ष कार्याची जबाबदारी सोपवली नाही. माजी नगरसेवक, कार्यकर्ता म्हणून मला कधी विश्वासात घेतले नाही. मी माझा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com