राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजप अडचणीत! आधी कार्यकारिणी बरखास्त नंतर बडतर्फीच्या नोटिसा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बालेकिल्ल्यात भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दोडामार्ग तालुक्याची भाजप (BJP) कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नगराध्यक्ष निवडीवेळी (Nagar Panchayat Election) भाजपच्या नगरसेवकांचा एक गट अनुपस्थित राहिल्याने ही कारवाई करण्यात आली. कार्यकारिणी बरखास्त करूनही भाजपमधील वाद मिटलेला नसून, आता काही जणांना बडतर्फीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दोडामार्गमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू आहे. याचा फटका जिल्हा बँक निवडणुकीपासून ते नगरपंचायत निवडणुकीपर्यंत पक्षाला बसला आहे. दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीतही गटबाजी दिसून आली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने याची गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे चेतन चव्हाण हे कसई दोडामार्ग नगरपंचयातचे नगराध्यक्ष झाल्यानंतर 24 तासांतच दोडामार्ग भाजपची कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी केली होती.

Narayan Rane
जिल्हा परिषदेत असं पहिल्यांदाच घडलं! सभा चालू असतानाच अधिकाऱ्याचा पदभार काढला

भाजप कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे होती.काही नेते पक्षशिस्त न मानता काम करीत आहेत. भाजपत पक्ष शिस्त महत्त्वाची असून ती मोडली गेल्यास कारवाई होते. यामुळे ही कारवाई केल्याचे राजन तेली यांनी सांगितले होते. पक्षांतर्गत वाद मिटत नसल्यामुळे तेली यांनी काही पदाधिकाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा बजावण्यात येतील, असे जाहीर केले आहे. कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमोद कामत आणि महेश सारंग हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

Narayan Rane
योगीच्या नादाला लागणं शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना पडलं महागात; कारवाईचा आवळला फास

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या चार नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांतील चारपैकी दोन ठिकाणी महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. कुडाळ (Kudal) नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड झाली. देवगड-जामसंडे नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या साक्षी प्रभू नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत उपनगराध्यक्ष झाल्या. वैभववाडीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत विजयी झाले. दोडामार्गमध्ये भाजपचे चेतन चव्हान विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com