जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि झेडपी अध्यक्षांमध्ये मोबाईलवरून खडाजंगी!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण शिगेला पोचलेले असताना एका पदाधिकाऱ्याच्या घरासमोर भानामतीचा प्रकार उजेडात आला.
Satish Sawant-sanjana sawant

Satish Sawant-sanjana sawant

Sarkarnama

Published on
Updated on

कणकवली : कणकवली तहसील कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकेसाठी (Sindhudurg District Bank election) सकाळच्या सत्रात शांततेत मतदान सुरू झाले. मात्र मतदान केंद्रात मोबाईल आणल्‍याच्या मुद्दयावर जिल्‍हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उमेदवार सतीश सावंत आणि जिल्‍हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्यात मतदान केंद्रातच जोरदार खडाजंगी झाली. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करून वादाचा पुढील प्रसंग टाळला. (Sindhudurg District Bank President and ZP President clash on mobile)

दरम्‍यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, शिवसेना शाखा, पटवर्धन चौक आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. मतदान केंद्रातील वादंगाच्या घटनेनंतर जिल्‍हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कणकवली पोलीसात धाव घेतली होती.

Satish Sawant-sanjana sawant

कोल्हापूरच्या सतेज पाटलांनी केले सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेसाठी मतदान!

कणकवली तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात आलेल्‍या जिल्‍हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सहकार समृद्धी पॅनलचे उमेदवार सतीश सावंत हे मोबाईल घेऊन आले असल्‍याचा आक्षेप घेतला. त्‍यांनतर याच मुद्दयावर संजना सावंत आणि सतीश सावंत यांच्यात बाचाबाची झाली. दोघेही जण एकमेकांविरोधात बोलत असल्‍याने वादंग आणि तणाव वाढला होता. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांनाही बाजूला घेत या प्रकरणावर पडदा. या घटनेमुळे मतदान केंद्रा बाहेरही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Satish Sawant-sanjana sawant

राणे-शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधुदुर्ग बॅंकेसाठी ९८. ६७ टक्के मतदान

भानामतीच्या प्रकाराचीही चर्चा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण शिगेला पोचलेले असताना एका पदाधिकाऱ्याच्या घरासमोर भानामतीचा प्रकार उजेडात आला. या पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर अज्ञाताकडून कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर ठेवले होते. कणकवलीतील हा पदाधिकारी रात्री उशिरा घरी आला असता त्‍याच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्‍यानंतर गेटसमोरील सर्व साहित्‍य हटविण्यात आले.

Satish Sawant-sanjana sawant

उद्धवजींच्या शस्त्रक्रियेनंतर फडणवीसांचा रश्मीवहिनींना फोन; म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांचे आमच्यावर उपकार!

सतीश सावंत यांच्या अटकेची मागणी

मतदान केंद्रावर मोबाईल आणून नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. तरीही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल आणला. त्‍यावर आक्षेप घेतला असता त्‍यांनी आक्षेपार्ह शब्‍द वापरले त्‍यामुळे त्‍यांच्यावर अटकेची कारवाई करा, अशी मागणी पोलिस निरीक्षकांकडे केल्‍याची माहिती जिल्‍हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com