

Pradeep Purnekar murder case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी त्यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बालेकिल्ला ठाण्यात ही भेट झाली.
आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, राम पूर्णेकर यांनी मला काहींना मुख्यमंत्र्यांना भेटू द्यायचे नव्हते, असा खळबळजनक दावा केला आहे. राम पूर्णेकर यांच्या या दाव्यामुळे कोणत्या यंत्रणेला मुख्यमंत्र्यांना भेटू द्यायचे नव्हते, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
ठाणे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर उर्फ बाळू यांची 29 सप्टेंबर 2026 रोजी रात्री ठाण्यातील मानपाडा त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या झाली. या हत्येप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाप्रमुख माजी महापौर नगरसेवक मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याभोवती संशयाचे जाळे आहे.
मीनाक्षी शिंदे यांना त्यांच्या राजकीय पदाचा राजीनामा द्यावा लागत, तर राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत, या गुन्ह्यात (Crime) दाखल एसआयटीने दहाहून अधिक वेळा चौकशी केली आहे. तसेच मीनाक्षी शिंदे यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. शिंदे दाम्पत्य आरोपांच्या फेऱ्यात अडकले असताना, त्यांचा सार्वजनिक वावर कायम आहे. यातून त्यांना राजकीय शक्ती वाचवण्याच प्रयत्न करत असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबियांकडून होत आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मयत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी भेट घेतली. 'ही भेट होऊ नये, यासाठी अनेकांचा प्रयत्न होता,' असा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. 'या भेटीपूर्वी मला खूप मोबाईलवर संपर्क होत होते. पण मी मोबाईल बंद करून ठेवला होता. परंतु थोड्याच दिवसात कळेल की, काय चालले आहे. त्यांना सगळं सांगितले आहे. चुकीचे घडले आहे. न्याय मागितला आहे,' असे राम पूर्णेकर यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांशी ही भेटीत खुलेपणाने चर्चा झाली. कोणतीही चर्चा बंद दाराआड झालेली नाही. आजच्या भेटीत बोलणं खूप शांत चित्ताने झाले. ठाण्यामध्ये जे चालले आहे, ते सर्व समजावून सांगितले आहे, जे पुरावे होते ते सर्व मी दाखवले आहेत. गेले महिनाभर उलटून देखील 5 आरोपी अटक आहेत. नाव नोंदवले गेलेले आरोपी शिंदे यासंदर्भात बोलणं झाले. पोलिसांच्या तपासावर बोलताना, नाराजी वगैरे काही नाही, जे होतं ते क्लिअर थेट बोललो आहे. माझ्या भावना, केसच्या घटनेसंदर्भात आणि माझ्याभोवती असलेल्या घडामोडींविषयी सर्व काही सांगितल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले.
29 सप्टेंबरपासून आत्तापर्यंत मी त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवली आहे. मला अपेक्षा आहे की, न्याय मुख्यमंत्री सरांकडूनच मिळेल. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी देखील सांगितले आहे की, न्याय मिळेल. या आश्वासनावर पुढे काय कारवाई होते हे कळेलच, असेही राम पूर्णेकर यांनी म्हटले. या भेटीनंतर ठाणे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.