Pune Students Drowned : कोकण पर्यटनास गेलेले पुण्यातील सहा विद्यार्थी देवगडच्या सुमद्रात बुडाले!

Konkan News : चार विद्यार्थीनींचे मृतदेह सापडले, एक विद्यार्थ्यास वाचवण्यात यश तर अन्य एकाचा शोध सुरू
Drowned
Drowned Sarkarnama
Published on
Updated on

Devgad News : निसर्ग पर्यटनासाठी कोकणात गेलेले सहा विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाल्याची घटना घडली. पुण्यातील एका खासगी सैनिक अकॅडमीचे हे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

सुमद्रात बुडालेल्या सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एकास वाचवण्यात यश आले आहे. याशिवाय उर्वतरीत एकाचा अद्यापही शोध सुरू आहे. वाचवण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यावर देवगडमधील ग्रामीण रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Drowned
Talawade Fire Accident : तळवडे जळीतकांडात मोठी अपडेट; चार कारखाना मालकांवर गुन्हा, पण...

या सहा विद्यार्थ्यांमध्ये चार मुली आणि एक मुलाचा समावेश होता. यापैकी चार मुलींचे मृतदेह सापडले आहेत. प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे अशी त्यांची नावे आहेत. तर आकाश तुपे या विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले असून, राम डिचवलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे. हे विद्यार्थी समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळाताच बचावकार्य सुरू झाले. बुडालेल्या विद्यार्थांचा शोध घेणे सुरू झाले, घटनास्थळी पोलीस हजर झाले. तर या घटनेमुळे देवगडमध्येही खळबळ उडाली.

Drowned
Devendra Fandnavis : ''अरे गजानन महाराजांसमोर तरी...'' ; फडणवीसांनी 'त्या' प्रश्नावर भाष्यच टाळलं!

निसर्ग पर्यटनासाठी पिंपरी-चिंचवडमधील सैनिक शाळेचे एकूण 35 विद्यार्थी देवगड येथे आले होते. या ठिकाणी सुमद्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उतरल्यानंतर त्यांना खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले. अन्य विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com