जयंत पाटलांच्या कृपेनेच सुनील तटकरे दिल्लीत गेलेत

शेकापचे जयंत पाटील यांना सोबत घेतल्याशिवाय जिल्ह्यात कोणालाच राजकारण करता येणार नाही.
Pandit Patil
Pandit PatilSarkarnama
Published on
Updated on

रायगड : रायगड जिल्ह्यातील राजकारण हे आतापर्यत शेतकरी कामगार पक्षाच्या मताने चालले आहे. शेकापचे जयंत पाटील (jayant Patil) यांना सोबत घेतल्याशिवाय जिल्ह्यात कोणालाच राजकारण करता येणार नाही. आमदार जयंत पाटील यांच्या कृपेनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे दिल्लीत गेले आहेत. मात्र, लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देऊनही खासदार आणि पालकमंत्री उपस्थित राहिले नाहीत, अशा शब्दांत माजी आमदार पंडीत पाटील यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. (Sunil Tatkare has become an MP due to grace of Jayant Patil : Pandit Patil)

रायगड जिल्ह्यातील कुर्डुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा आज (ता. २१ फेब्रुवारी) आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्या कार्यक्रमात माजी आमदार पंडीत पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. मात्र, ते दोघेही या कार्यक्रमाला गैरहजर होते, त्यामुळे चिडलेल्या पाटील यांनी वरील शब्दांत हल्लाबोल केला.

Pandit Patil
दीपक साळुंखेंचे भाषण थांबवत जयंत पाटील म्हणाले, ‘टोपी-धोतरवाल्यांवर माझा जास्त विश्वास’

पाटील म्हणाले की, जयंत पाटलांना सोबत घेतल्याशिवाय रायगड जिल्ह्यात कोणालाच राजकारण करता येणार नाही. रायगड जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष हा शेकापच्याच मताने होणार, असे भाकितच माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आमदार जयंत पाटील यांच्या कृपेनेच सुनील तटकरे हे दिल्लीत गेले आहेत. मात्र, आज लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देऊनही खासदार तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहिले नाहीत.

Pandit Patil
परिचारक गटाचे तीन नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकरी कामगार पक्षाशिवाय रायगड जिल्ह्याचे राजकारण होऊ शकणार नाही, असे भाकीत केले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकरची भूमिका बजावणार, असल्याचे संकेत शेकाप नेत्यांच्या भाषणातून मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com