परिचारक गटाचे तीन नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

राष्ट्रवादीतील सर्व गट मतभेट विसरून एकत्र आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील एकोपा कार्यकर्त्यांना दिलासा देणारा ठरला आहे.
prashant paricharak
prashant paricharakSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके (bhagirath Bhalke) हे मतदारसंघातून गायब झाले होते. मात्र, सोलापूर जिल्हा दूध संघाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर भालके चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या तीन नरसेवकांना गळाला लावले असून ते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (Three corporators of Paricharak group will join NCP)

विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव आणि विठ्ठल कारखान्यावर आलेल्या आर्थिक संकटानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके हे पंढरपुरातून गायब होते. मात्र, सोलापूर जिल्हा दूध संघ, पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके हे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी सरकोलीत बैठकीत पंढरपूर नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच कार्यकर्त्यांसमोर केले होते.

prashant paricharak
आमदार सावरकरांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई...

राजश्री गंगेकर, अक्षय गंगेकर, रंजना पवार या नरसेवकांसह शंकर पवार हे आपल्या समर्थकांसह परिचारक गटाची साथ सोडून हाती घड्याळ बांधणार आहेत. तोंडावर आलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक गटाला हा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपुरात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

prashant paricharak
पशुखाद्य गैरव्यवहार : लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील सर्व गट मतभेट विसरून एकत्र आले आहेत. युवराज पाटील, गणेश पाटील आणि भगिरथ भालके यांची नुकतीच एकत्रित बैठक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील एकोपा कार्यकर्त्यांना दिलासा देणारा ठरला आहे. पण, तो कायमस्वरूपी टिकण्याची गरज राष्ट्रवादीचे निष्ठावंत जुने जाणते कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

दुसरीकडे, तीन नगरसेवकांनी साथ सोडल्यामुळे परिचारक यांना निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे. यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com