कोकणात पन्हा राजकीय भूकंप? राज ठाकरेंनी नाकारलेला नेता हातात कमळ घेणार! समर्थकांचे स्टेटस व्हायरल अन् ‘मोर्चेबांधणी’ही सुरू!

MNS Former Leader Vaibhav Khedekar Join BJP? : मनसेने आगामी स्थानिकच्या आधीच रत्नागिरीतील खेडचे माजी नगराध्यक्ष तथा राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यांसह तिघांवर कारवाई केली होती.
raj thackeray
raj thackeray sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. कोकणातील वैभव खेडेकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष वाढला आहे.

  2. खेडेकर समर्थकांचे “आम्ही निघतोय… तुम्ही येता का?” असे व्हायरल स्टेटस राजकीय चर्चेत आले आहेत.

  3. या हालचालींमुळे भाजपकडे पक्षप्रवेशाची शक्यता तीव्र होत असून कोकणातील राजकारण तापलं आहे.

Ratnagiri News : तळ कोकणात सध्या आगामी स्थानिकच्या निवडणुकीवर राजकीय वातावरण तापलेलं आहेत. नुकताच एक मोठा पक्ष प्रवेश भाजपमध्ये झाल्याने शिवसेना आणि भाजप आमसे-सामने आली आहे. महायुतीतच सध्या दोस्तीत कुस्तीचा फड रंगला असतानाच आता यात आणखी एका प्रवेशामुळे टेन्शन वाढणार आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादीवर भाजप वरचढ ठरली असून आणखी एक प्रवेश भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे. मनसेनं नुकताच कोकणातील एकमेव नेते राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांवर कारवाई केली होती. हीच कारवाई आता भाजपच्या पत्त्यावर पडण्याची शक्यता असून सध्या खेडेकर यांच्या समर्थकांचे स्टेटस चर्चाचा विषय ठरला आहे. खेडेकर यांच्या समर्थकांकडून सध्या पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी केली जात असून आम्ही निघतोय... तुम्ही येता का? असे स्टेटस फिरताना दिसत आहेत.

खेडेकर यांच्यासह तिघांवर भाजपशी जवळीक आणि पक्षांच्या विचारांशी तडजोड केल्याचा ठपका ठेवत बडतर्फीची मोठी कारवाई पक्षाने केली होती. यानंतर लगेच खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत लवकच राजकीय निर्णय घेऊ असे अश्रू नयनांनी सांगितले होते. तर खंत व्यक्त करताना आपण पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले त्याची हिच का पोच पावती असा सवाल केला होता.

raj thackeray
Vaibhav Khedekar: कोकणात लवकरच मोठा राजकीय भूकंंप? खळबळ उडवून देणाऱ्या स्टेटसनंतर वैभव खेडेकरांचं मोठं विधान; म्हणाले,होय...

याचवेळी त्यांनी आपल्याला अनेकांचे फोन आले असून पहिला फोन मंत्री नितेश राणेंचा आला होता. तसेच राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासह माजी आमदार संजय कदम यांचाही फोन केल्याचे खेडेकर यांनी सांगितले होते. यामुळे खेड परिसरात पकड मजबूत असणाऱ्या नेत्याला आपल्याकडे घेण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचे समोर आले होते.

पण आता खेडेकर यांच्या समर्थकांनी नव्या रजाकीय अध्यायाकडे वाटचाल केल्यासे दिसत असून त्यांनी लावलेल्या स्टेटस आणि व्हायरल झालेल्या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी सेनापती जिकडं... आपणही तिकडं... आम्ही निघतोय... तुम्ही येता का? अशा पोस्ट आता व्हायरल होत आहेत.

या पोस्टमुळे खेडेकर 4 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करून कमळ घाती घेतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. सध्या या प्रवेशाची कार्यकर्ते जय्यत तयारी करत असून नेतृत्व तेच... विचारधारा नवी असा नाराही खेडेकर यांचे कार्यकर्ते देताना दिसत आहेत. त्यामुळे तळ कोकणासह राज्याचे लक्ष आता या प्रवेशाकडे लागले आहे. तसेच या प्रवेशावेळी कोण कोण मनसे सोडतं? कोणाचा प्रवेश होतो? कोण हातात कमळ घेतो, याचीही उत्सुकता तळ कोकणात लागली आहे.

raj thackeray
Pooja Khedekar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचं 'नगर कनेक्शन!'; 'त्या' 2 IMP प्रमाणपत्रांबाबत धक्कादायक माहिती समोर

FAQs :

प्र.१. वैभव खेडेकर कोण आहेत?
उ. वैभव खेडेकर हे खेडचे माजी नगराध्यक्ष आणि कोकणातील महत्त्वाचे राजकीय नेते आहेत.

प्र.२. त्यांच्या समर्थकांचे व्हायरल स्टेटस काय आहे?
उ. “आम्ही निघतोय… तुम्ही येता का?” असे स्टेटस सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.

प्र.३. भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता आहे का?
उ. होय, खेडेकर समर्थकांकडून भाजप प्रवेशाची जय्यत तयारी सुरू असल्याच्या चर्चा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com