BJP-Thackeray Group Politics : ठाकरेंच्या वाघिणी भिडल्या; भाजप तालुकाध्यक्ष नरमले, नक्की झालं काय?

Kokan Politics : नेतेमंडळीपर्यंत मर्यादित असलेला भाजप-ठाकरे गटाचा संघर्ष हळुहळु आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला आहे.
BJP-Thackeray  Politics :
BJP-Thackeray Politics : Sarkarnama
Published on
Updated on

संभाजी थोरात

Ratnagiri News : नेतेमंडळीपर्यंत मर्यादित असलेला भाजप-ठाकरे गटाचा संघर्ष हळुहळु आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला आहे. याच एक उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळालं. गेल्या तीन महिन्यांपासून रेशन मिळत नसल्याच्या कारणावरून मंगळवारी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजप तालुकाध्यक्षाच्या स्वस्त धान्य दुकानासमोर घोषणाबाजी केली, या परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

रत्नागिरीत भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांच्या नावे परवाना असलेले स्वस्त धान्य दुकान आहे. पण गेल्या तीन महिन्यांपासून दुकानात धान्यच मिळत नसल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी दुकानासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांना तातडीने धान्य वितरीत करावे, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर दुकानातून धान्य वितरण सुरू करण्यात आले.

BJP-Thackeray  Politics :
Villagers Protest Against Abhimanyu Pawar : आमदार अभिमन्यू पवारांच्या विरोधात ग्रामस्थांचा 'एल्गार' ; पुतळा जाळला..

मुन्ना चवंडे यांचे मांडवी बंदर परिसरात स्वस्त धान्य दुकानाचे दोन गाळे आहेत. पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून या दुकानांमध्ये धान्य मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत होती. यापूर्वी याबाबत लोकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी थेट दुकानासमोच मोठा गोंधळ घातला.

दुकानात वेळेत धान्य मिळावे, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या महिला आणि कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी दुकानासमोर जाऊन धान्य वेळेत मिळावे, अशी मागणीही केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.

BJP-Thackeray  Politics :
Villagers Protest Against Abhimanyu Pawar : आमदार अभिमन्यू पवारांच्या विरोधात ग्रामस्थांचा 'एल्गार' ; पुतळा जाळला..

दुसरीकडे, दुकानावरील कामगाराच्या आईच निधन झाल्याने दुकान बंद असल्याची माहिती मुन्ना चवंडे यांनी दिली. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी आपण ठाकरे गटाच्या कार्यालयात जाणार असल्याचंही त्यांनी नमुद केलं. आक्रमक महिला दुकानासमोर गेल्यानंतर दुकानातील धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com