Villagers Protest Against Abhimanyu Pawar : आमदार अभिमन्यू पवारांच्या विरोधात ग्रामस्थांचा 'एल्गार' ; पुतळा जाळला..

Nilanga Tehsil News : आमदार पवार यांच्याविरोधात ६८ गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे.
MLA Abhimanyu Pawar
MLA Abhimanyu PawarSarkarnama
Published on
Updated on

Latur : लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथील कासार-शिरशी महसूल मंडळात ६८ गावांसाठी नव्याने होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास कासार-शिरशी परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे.

"ग्रामस्थांची मागणी नसतानाही आमदार पवार यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कासार-शिरशी येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याचा डाव रचला आहे," असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमदार पवार यांच्याविरोधात ६८ गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे.

आज (बुधवारी) आक्रमक झालेल्या आंदोलकांनी निलंगा पंचायत समितीसमोर अभिमन्यू पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तो पुतळा जाळण्यात आला.

MLA Abhimanyu Pawar
MP Hemant Patil Slaps Tehsildar: एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन ; शिवसेना खासदाराने तहसीलदाराला झाप झाप झापलं..

महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर दुर्लक्षित असलेला कासार शिरशी येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरु आहेत.कासार शिरशी हे पोलीस ठाण्याचे ठिकाण आहे. यात जिल्हा परिषदेचे गट आहेत. या भागातील नागरिकांना प्रशासकीय, न्यायालयीन व अन्य कामासाठी निलंग्याला जावे लागते.

MLA Abhimanyu Pawar
Complaint filed Against Gulabrao Patil : पालकमंत्री गुलाबराव पाटलांना दाखवा, ११०० रुपये बक्षीस मिळवा ; पोलीस ठाण्यात तक्रार

निलंगा तहसील कार्यालयावरील ताण कमी करण्यासाठी कासार शिरशी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याची मागणी दोन-तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पण आता ग्रामस्थांचा विरोध होत असल्याने याबाबत प्रशासन काय निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com