Jain Muni NileshChandra : जैन मुनी नीलेशचंद्र पुन्हा गरजले; खबरदार! मारवाडी, जैनांना हात लावला, तर..!

Non-Marathi Trader Assault in Mira Bhayandar Jain Muni Nileshchandra Issues Fresh Warning : ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर मधील अमराठी व्यापाऱ्याला मारहाणीवरून जैन मुनी नीलेशचंद्र आक्रमक झाले आहेत.
Jain Muni Nilesh Chandra
Jain Muni Nilesh ChandraSarkarnama
Published on
Updated on

Mira Bhayandar trader assault case : जैन मुनी नीलेशचंद्र हे ठाण्यातील मीरा-भाईंदर इथं कार्यक्रमाला होते. तिथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पु्न्हा अमराठी व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून इशारा दिला आहे. नीलेशचंद्र यांनी हा इशारा देताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलं.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नीलेशचंद्र यांनी मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्याला मारहाणीचा मुद्दा उकरून काढल्याने, त्यामागे पुन्हा मोठं राजकारण सुरू झाल्याची चर्चांनी जोर पकडला आहे.

जैन मुनी नीलेशचंद्र म्हणाले, "मीरा-भाईंदरमध्ये एवढ्यासाठी आलो आहे की, जेवढे आमचे राजस्थान 36 कोम लोक म्हणतात की, एकत्र आलो, तरी मारणार, आप मारे, हम भी है! आप भी है! आम्ही महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सर्वांचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आदर करतो." आम्ही मारवाड्यांना देखील सांगितलं आहे की, आपल्या दुकानावरील पाट्या मराठीमध्ये लावा. दुकानांमध्ये जय जिनेंद्र आणि जय महाराष्ट्र हे देखील लावा. तुम्ही मारवाडी असाल, तर तुम्ही जय सियाराम, जय हनुमान लिहा. जय महाराष्ट्र लिहा. पण महाराष्ट्राचा सन्मान करा, असे नीलेशचंद्र यांनी म्हटले.

राज्यातील देशी गायीला सरकारने राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या रक्षणात गोरक्षकांवर हल्ले खूप होत आहेत. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, इथं गोरक्षकांवर हल्ले झाले आहेत. निवडणुका (Election) आले की, काही नेत्यांचं हिंदुत्व जागं होतं. गोरक्षकाच्या रक्षणासाठी मग कोठे जातात, असा सवाल नीलेशचंद्र यांनी विचाराला.

Jain Muni Nilesh Chandra
Kangana Ranaut controversy : भाजपच्या कंगनाने, शेतकरी महिलांना अपमान केला, 100 रुपयांच्या रोजंदारीवाले म्हटले; 86 वर्षांच्या आजीने कोर्टात खेचले, कर्जबाजारी झाल्या तरी...

भाजप हिंदुत्व ढोंगी

नरेंद्र मेहता यांच्या विषयी बोलताना, त्यांनी दर्गा बनवण्यासाठी पैसे दिले. तिथं जे काही आहे, ते सर्व यांचेच आहे. इथं नयानगरमध्ये तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? इथं राजा सिंह यांना यावं लागलं. मला आक्रमक भाषण द्यायची गरजचं नसती पडली. भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली ढोंगीपणा करत आहे, असं वाटतं का? यावर नीलेशचंद्र यांनी हो म्हणत ढोंगीपणाचा आहे, असा हल्ला चढवला. भाजप नेते नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांना बनावट वाघ-वाघीण म्हणत, त्यांच्या अहंकारावर नीलेशचंद्र यांनी टीका केली.

Jain Muni Nilesh Chandra
Hindi language imposition : निवडणुकीचा काळ, हिंदीविरुद्ध मराठी वाद पुन्हा उफाळणार? जाधव समिती त्रिभाषा धोरण अहवाल मुदतीपूर्वीच देणार

भाजपमध्ये काही गद्दार नेते

'योगी-नरेंद्र-देवेंद्र यांच्याशी अजिबात वैर नाही. पण त्यांच्याबरोबर काही गद्दार नेते आहेत. त्यांच्यावरील विश्वास नाही. तो उडून गेला आहे. मीरा-भाईंदर मधील लोक एकनाथ शिंदे यांच्याकडेच का जात आहेत, त्यांनी गोरक्षकांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. राजा सिंह हा माझा शिष्य आहे. तो माझ्या नावावर इथं आला होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र होतो. परंतु उच्च न्यायालयाचे आम्हाला परवानगी मिळाली नाही,' असे नीलेशचंद्र म्हटले.

मुस्लिमांकडून गोमांस विक्री बंद

'नयानगर इथल्या, मुस्लिम समाजाने गोमांस विक्री होणार नाही, जो गोमांस विक्री करेल, त्याचे दुकान आम्ही बंद करू, असा पुढाकार घेतला आहे, यावर अजून कोणतं परिवर्तन हवं आहे, असा प्रतिप्रश्न नीलेशचंद्र यांनी केला. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे की, मी कोणत्याही धर्म विरोधात नाही, टोपीवाल्या विरोधात नाही, परंतु टोपीवाल्यांच्या मध्ये असलेल्या जिहादीच्या विरोधात आहे,' याची आठवण नीलेशचंद्र यांनी करून दिली.

बाबर का पाहिजे?

'मुस्लिमांना बाबर का पाहिजे? असा प्रश्न करताना, मुस्लिमांमध्ये अनेक धर्मवीर होऊन गेलेले आहेत, मशीद बांधताना, अल्ला, सय्यद, पैगंबर यांच्या नावाने बांधा, तुम्हाला बाबर का पाहिजे? तुम्ही वेगळा बाबर तयार केल्यास, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज देखील पैदा करू अन् महाराणा प्रताप देखील पैदा करू,' असा इशारा नीलेशचंद्र यांनी दिला.

पुन्हा मराठी-अमराठी वाद

जैन मुनी नीलेशचंद्र यांनी मीरा-भाईंदर इथं यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाणीचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा एकदा धार्मिक प्रसाराचं कार्य करणाऱ्या जैन मुनीच्या तोंडातून बाहेर पडणं, यामागे महापालिका निवडणुकांमध्ये पु्न्हा मराठी-अमराठी वाद निर्माण करण्याचं राजकारण, तर नाही ना? असा प्रश्न चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com