Eknath Shinde Thane residence : शिंदेंच्या निवासस्थानी मनसे उमेदवार, कशासाठी? ठाकरेंच्या शिलेदारांनी व्हिडिओच आणला समोर...

Thane Civic Election: Video Shows MNS, MVA Candidates Taken to Eknath Shinde Residence : महापालिका निवडणुकीतील मनसे उमेदवारांना एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी नेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Eknath Shinde Thane residence
Eknath Shinde Thane residenceSarkarnama
Published on
Updated on

Thane Municipal Corporation election : ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सत्ताधाऱ्यांकडून दमबाजी केली जात आहे. तसंच उमेदवारांना सत्ताधारी नेत्यांच्या निवासस्थानी नेले जात आहे.

तिथून आल्यानंतर उमेदवार निवडणुकीत माघार घेत असल्याचा प्रकार घडत आहे. असाच एक व्हिडिओ ठाकरे बंधूंचे शिलेदार राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी समोर आणला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मनसेचा (MNS) उमेदवार विक्रांत घाग यांना नेण्यात आल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव आणि राजन विचारे यांनी समोर आणला आहे. सध्या या उमेदवाराचा मोबाईल बंद आहे. या उमेदवाराला पोलिस कर्मचारी घेऊन जात असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घरी गेल्यानंतर आमचा उमेदवार अर्ज मागे घेतो. ठाणे महापालिका निवडणुकीतील मविआच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दमबाजी केली जात आहे. सत्ताधाऱ्यांची दमबाजी, अमिषांना बळी न पडण्याचं आवाहन करताना, पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांचा देखील पाहुणचार केला जाईल, अर्ज मागे घेणाऱ्यांचा देखील समाचार घेतला जाईल, असा सूचक इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

Eknath Shinde Thane residence
Senior Citizens remark controversy : शिंदेंच्या शिवसेनेचा शिलेदार म्हणतो, 'ज्येष्ठ नागरिक रिकामटेकडी असतात, त्यांना...'

ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या सात उमेदवारांच्या विरोधात मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षानी संयुक्त पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. पाच कोटी रुपये देत उमेदवारी अर्ज माघार घेण्या करिता दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मनसेने केला होता. याच प्रकरणातील काही कॉल रेकॉर्डिंग आणि पुरावे मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने पत्रकार परिषदेत मांडले.

Eknath Shinde Thane residence
Top 10 News : हळूच लिंबू सोडून गेल्या, ठाकरेंविरोधात गुजराती-हिंदी भाषिक एकवटले, एकनाथ शिंदेंना काँग्रेसची मदत; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

राजन विचारे यांनी बिनविरोध निवडीवरून महायुतीवर निशाणा साधला आहे. 68 बिनविरोध झाले आहेत, त्यापैकी एकही विरोधात नाही, असे होऊ शकत का? सदरचे षडयंत्र आहे. त्यांनी बंगल्यावर बोलवून, दादागिरी करत, आमिष दाखवले. पोलिसांचा देखील यात समावेश आहे, असा गंभीर आरोप केला

अविनाश जाधव यांनी हा व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, मनसेच्या उमेदवाराला पोलिस कर्मचारी एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर घेऊन जाताना दिसत आहे. विक्रांत घाग याला पोलिस घेऊन चालले आहेत. त्याला का घेऊन जात आहे. एकनाथ शिंदे यांचे घरी आमच्या उमेदवाराला घेऊन जात आहेत, कारण काय आहे? निवडणुकीच्या काळातच मनसेच्या कार्यकर्ते, उमेदवारांची आणि मविआच्या उमेदवारांचीच का आठवण येते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com